5 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs
5 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 फेब्रुवारी 2022)
बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकला प्रारंभ :
- बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी झाला.
- तर या निमित्ताने बीजिंग हा दोन्ही ऑलिम्पिकचे आयोजन करणारा पहिलाच देश ठरला आहे.
- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांच्या उपस्थितीत नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सोहळय़ात लेझर-किरणांचा देखावा सादर करण्यात आला.
- भारताने या स्पर्धेच्या प्रक्षेपणावर बहिष्कार टाकला असून आरिफ खान हा एकमेव भारतीय स्पर्धक या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):
उत्तर प्रदेशचा चित्ररथ ठरला सर्वोत्तम :
- प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आलं आहे.
- त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या चित्ररथालाही सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे.
- सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिलीय.
- यंदा संचलनात जवळपास 12 राज्यांचे आणि 9 मंत्रालयांचे असे 21 चित्ररथ सहभागी झाले होते.
- त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळालाय.
- तर याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आलं आहे.
- मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आलाय.
योगी आदित्यनाथ आज गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार :
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार योगी आदित्यनाथ आज गोरखपूर (शहर) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी दाखल करणार आहेत.
- तर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्व तयारी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे.
- पाच वेळा माजी लोकसभेचे खासदार राहिलेले योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच राज्य विधानसभेची निवडणूक उमेदवार म्हणून लढवत आहेत.
- तर, अमित शाह यांनी यापूर्वीच योगी आदित्यनाथ यांना पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलेलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकलली :
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET PG परीक्षा 2022 सहा ते आठ आठवड्यांनी पुढे ढकलली आहे.
- तर याआधी ही परीक्षा 12 मार्च रोजी होणार होती.
- तसेच आता ती परीक्षा मे-जून मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिनविशेष:
- चार्ली चॅप्लिनने सन 1919 मध्ये इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली होती.
- सन 1952 मध्ये स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.
- सन 2003 या वर्षी भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
- पुण्याची स्वाती घाटे ही सन 2004 या वर्षी बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.