6 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs
6 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 फेब्रुवारी 2022)
भारत पाचव्यांदा बनला जगज्जेता :
- अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
- तसेच भारत पाचव्यांदा अंडर 19 विश्वविजेता ठरला आहे.
- तर या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत आटोपला.
- राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला.
- तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदावरून लँगरचा राजीनामा :
- कठोर मार्गदर्शनशैलीबद्दल संघातील अनुभवी खेळाडूंच्या तक्रारी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया मंडळाच्या संचालक मंडळाशी मतभेद यामुळे जस्टिन लँगरने शनिवारी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
- लँगरने मेलबर्नहून पर्थ येथील निवासस्थानी प्रयाण केले असून, लँगरशी करारबद्ध असलेल्या डीएसईजी या व्यवस्थापन कंपनीने ही घोषणा केली.
- लँगरला अल्पमुदतवाढीचा करार देण्यासाठी मंडळ उत्सुक होते. पण हा प्रस्ताव त्याने फेटाळला.
- साहाय्यक प्रशिक्षक अॅन्डर्य़ू मॅक्डोनाल्ड यांच्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नॅशनल कॉन्फरन्सला सीमांकन अहवाल अमान्य :
- जम्मू-काश्मीरमध्ये काही नव्या मतदारसंघांची निर्मिती आणि काही मतदारसंघांची फेररचना सुचवणारा सीमांकन आयोगाचा दुसरा मसुदा अहवाल नॅशनल कॉन्फरन्सने शनिवारी नाकारला.
- तर नव्या अहवालात या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा, तसेच जम्मू भागात सहा व काश्मीरमध्ये एक मतदारसंघ वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
- सीमांकन आयोगाने सहयोगी सदस्यांना 4 फेब्रुवारीला उपलब्ध करून दिलेला मसुदा अहवाल नॅशनल कॉन्फरन्स तत्काळ नाकारत आहे, असे पक्षाचे प्रवक्ते इम्रान नबी दार म्हणाले.
दिनविशेष:
- आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी झाला होता.
- सन 1918 मध्ये 30 वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1928 या वर्षा पासून मध्ये हे वय 21 करण्यात आले.
- कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने सन 1932 मध्ये बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या होत्या.