4 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs
4 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 जुलै 2022)
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर :
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली.
- तर या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने राज्यातील सत्तानाटय़ात शिवसेनाअंतर्गत सुरू असलेल्या सत्तासंघर्षांत भाजप व शिंदे गटाने बाजी मारीत पहिला अंक जिंकला.
- तसेच आवाजी मतदानाने झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांना 164, तर शिवसेनेचे राजन साळवी यांना 107 मते मिळाली.
- आतापर्यंत विधानसभा अध्यक्षपद भूषविलेल्यांमध्ये नार्वेकर हे सर्वात तरुण आहेत.
- राज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षपदी निवड होणारे नार्वेकर हे 16वे अध्यक्ष आहेत.
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नाना पटोले यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्त होते.
Must Read (नक्की वाचा):
युक्रेनचे लिसिचान्स्क शहर रशियाच्या ताब्यात :
- रशियन सैन्याने रविवारी युक्रेनच्या लुहान्स्क प्रांतातील शेवटचे मोठे शहर लिसिचान्स्क ताब्यात घेतले.
- तर या विजयासह रशियाने युक्रेनचा जवळपास अवघा दोन्बास प्रदेश ताब्यात घेतल्याचा दावा रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी केला.
- युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी त्यावर लगेचच खुलासा करताना सांगितले, की युक्रेनच्या सैन्याने अनेक आठवडय़ांपासून लिसिचान्स्क शहराच्या बचावाचा प्रयत्न केला. आता मात्र रशियाविरुद्ध त्यांना हार मानावी लागत आहे.
- शेजारच्या श्व्यारोडोनेत्स्कचा अवघ्या आठवडय़ापूर्वी रशियाने ताबा घेतला होता.
- लुहान्स्कच्या राज्यपालांनी रविवारी पहाटे सांगितले होते, की युक्रेनच्या लुहान्स्क प्रांतातील शेवटचे महत्त्वाचे शहर काबीज करण्यासाठी रशियाची स्थिती मजबूत झाली आहे.
विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी :
- जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी 100 वर्षे पूर्ण झाली.
- लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटनेच्या ‘सेंटर कोर्ट’वर 1922 पासून सामने खेळवले जात आहेत.
- विम्बल्डन स्पर्धेतील रविवार हा परंपरेनुसार आरामाचा दिवस असतो.
- यंदा मात्र या नियमाला बाजूला सारत टेनिस सामने झाले आणि या दरम्यान ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी साजरी करण्यासाठी अनेक
- मान्यवरांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
महिला विश्वचषक हॉकी स्पर्धात भारत-इंग्लंड सामना बरोबरीत :
- पिछाडीवरुन पुनरागमन करत भारतीय संघाने महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी इंग्लंडविरुद्धचा ब-गटातील सलामीचा सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला.
- इंग्लंडकडून इसाबेला पीटरने नवव्या मिनिटाला, तर भारताकडून वंदना कटारियाने 28व्या मिनिटाला गोल केला.
- भारताला पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरला मिळाला; पण त्यांना गोल करता आला नाही.
- तर यानंतर पीटरने भारताच्या बचाव फळीला चकवत चेंडू गोल जाळय़ात मारला आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली.
- 28व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी कटारियाने संधीचा फायदा घेत गोल करताना भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
दिनविशेष :
- भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1898 मध्ये झाला होता.
- सन 1903 मध्ये मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
- सन 1947 मध्ये भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
- नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान सन 1997 मध्ये मंगळावर उतरले.
- सन 1999 मध्ये लष्कराच्या 18व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.