5 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs
5 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 जुलै 2022)
हॉटेल, रेस्टॉरंटच्या बिलातील सर्व्हिस चार्ज देणे बंधनकारक नाही :
- हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्जबाबत ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
- राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने यासंबंधी निर्देश जारी केले आहेत.
- हॉटेल आणि रेस्टॉरंट्स खाण्याच्या बिलावर सेवा शुल्क आकारु शकत नाहीत, असा निर्देश प्राधिकरणाने जारी केला आहे.
- हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून शुल्क आकार होते त्यावर आता प्राधिकरणाने बंदी घातली आहे.
- सीसीपीएने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ग्राहकाला सेवा शुल्क भरायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे.
- आक्षेप असल्यास, ग्राहक हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडून सेवा शुल्क वसूल करण्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक 1915 वर तक्रार करू शकतात.
- तसेच कोणत्याही हॉटेलने ते खाद्यपदार्थांच्या बिलात जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धात अल्फियाची सुवर्णकमाई :
- भारताच्या अल्फिया पठाणने माजी विश्वविजेत्या कझाकस्तानच्या लज्जत कुंगेबायेव्हाला पराभवाचा धक्का देत एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
- अल्फियाला 2021च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- कझाकस्तानची राजधानी नूर-सुलतान येथे झालेल्या या स्पर्धेतील 81 किलोवरील वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या अल्फियाने
- 2016च्या जागतिक स्पर्धेतील विजेत्या कुंगेबायेव्हावर 5-0 अशी सहज मात केली.
- अल्फियाने युवा जागतिक स्पर्धेतही सुवर्णपदक आपल्या नावे केले होते.
- एलोर्डा चषक स्पर्धेच्या माध्यमातून तिने वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदार्पण केले.
- तसेच 48 किलो वजनी गटातील दोन भारतीय बॉक्सिंगपटूंमध्ये झालेल्या अंतिम लढतीत गितिकाने कलैवानी श्रीनिवासनचा 4-1 असा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर मात :
- स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या सलामीच्या जोडीच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर 10 गडी राखून मात केली.
- श्रीलंकेने दिलेले 174 धावांचे लक्ष्य भारताने 25.4 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
- तसेच महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकही गडी न गमावता धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
दिनविशेष :
- सन 1913 मध्ये बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
- आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना 5 जुलै 1954 मध्ये झाली.
- बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन 5 जुलै 1954 मध्ये प्रसारित केले.
- सन 1975 मध्ये 5 जुलै रोजी भारतातून देवी रोग पूर्णपणे बरा झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.