4 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 जुलै 2022)
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर :
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली.
तर या निवडणुकीत नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने राज्यातील सत्तानाटय़ात शिवसेनाअंतर्गत सुरू असलेल्या सत्तासंघर्षांत भाजप व शिंदे गटाने बाजी मारीत पहिला अंक जिंकला.
तसेच आवाजी मतदानाने झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांना 164, तर शिवसेनेचे राजन साळवी यांना 107 मते मिळाली.
आतापर्यंत विधानसभा अध्यक्षपद भूषविलेल्यांमध्ये नार्वेकर हे सर्वात तरुण आहेत.
राज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षपदी निवड होणारे नार्वेकर हे 16वे अध्यक्ष आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नाना पटोले यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्त होते.
रशियन सैन्याने रविवारी युक्रेनच्या लुहान्स्क प्रांतातील शेवटचे मोठे शहर लिसिचान्स्क ताब्यात घेतले.
तर या विजयासह रशियाने युक्रेनचा जवळपास अवघा दोन्बास प्रदेश ताब्यात घेतल्याचा दावा रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी केला.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी त्यावर लगेचच खुलासा करताना सांगितले, की युक्रेनच्या सैन्याने अनेक आठवडय़ांपासून लिसिचान्स्क शहराच्या बचावाचा प्रयत्न केला. आता मात्र रशियाविरुद्ध त्यांना हार मानावी लागत आहे.
शेजारच्या श्व्यारोडोनेत्स्कचा अवघ्या आठवडय़ापूर्वी रशियाने ताबा घेतला होता.
लुहान्स्कच्या राज्यपालांनी रविवारी पहाटे सांगितले होते, की युक्रेनच्या लुहान्स्क प्रांतातील शेवटचे महत्त्वाचे शहर काबीज करण्यासाठी रशियाची स्थिती मजबूत झाली आहे.
विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी :
जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी 100 वर्षे पूर्ण झाली.
लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटनेच्या ‘सेंटर कोर्ट’वर 1922 पासून सामने खेळवले जात आहेत.
विम्बल्डन स्पर्धेतील रविवार हा परंपरेनुसार आरामाचा दिवस असतो.
यंदा मात्र या नियमाला बाजूला सारत टेनिस सामने झाले आणि या दरम्यान ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी साजरी करण्यासाठी अनेक
मान्यवरांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
महिला विश्वचषक हॉकी स्पर्धात भारत-इंग्लंड सामना बरोबरीत :
पिछाडीवरुन पुनरागमन करत भारतीय संघाने महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत रविवारी इंग्लंडविरुद्धचा ब-गटातील सलामीचा सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला.
इंग्लंडकडून इसाबेला पीटरने नवव्या मिनिटाला, तर भारताकडून वंदना कटारियाने 28व्या मिनिटाला गोल केला.
भारताला पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरला मिळाला; पण त्यांना गोल करता आला नाही.
तर यानंतर पीटरने भारताच्या बचाव फळीला चकवत चेंडू गोल जाळय़ात मारला आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली.
28व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी कटारियाने संधीचा फायदा घेत गोल करताना भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
दिनविशेष :
भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1898 मध्ये झाला होता.
सन 1903 मध्ये मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.
सन 1947 मध्ये भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.
नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान सन 1997 मध्ये मंगळावर उतरले.
सन 1999 मध्ये लष्कराच्या 18व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.