भारताच्या अल्फिया पठाणने माजी विश्वविजेत्या कझाकस्तानच्या लज्जत कुंगेबायेव्हाला पराभवाचा धक्का देत एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
अल्फियाला 2021च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कझाकस्तानची राजधानी नूर-सुलतान येथे झालेल्या या स्पर्धेतील 81 किलोवरील वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या अल्फियाने
2016च्या जागतिक स्पर्धेतील विजेत्या कुंगेबायेव्हावर 5-0 अशी सहज मात केली.
अल्फियाने युवा जागतिक स्पर्धेतही सुवर्णपदक आपल्या नावे केले होते.
एलोर्डा चषक स्पर्धेच्या माध्यमातून तिने वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदार्पण केले.
तसेच 48 किलो वजनी गटातील दोन भारतीय बॉक्सिंगपटूंमध्ये झालेल्या अंतिम लढतीत गितिकाने कलैवानी श्रीनिवासनचा 4-1 असा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर मात :
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या सलामीच्या जोडीच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर 10 गडी राखून मात केली.
श्रीलंकेने दिलेले 174 धावांचे लक्ष्य भारताने 25.4 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
तसेच महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकही गडी न गमावता धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
दिनविशेष :
सन 1913 मध्ये बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना 5 जुलै 1954 मध्ये झाली.
बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन5 जुलै 1954 मध्ये प्रसारित केले.
सन 1975 मध्ये 5 जुलै रोजी भारतातून देवी रोग पूर्णपणे बरा झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.