5 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित:
रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित

5 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2020)

रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित:

  • रशियाने विकसित केलेली आणि मंजुरी दिलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’मध्ये या बाबतची संशोधन माहिती समोर आली आहे.
  • चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस सुरक्षित असल्याचे आढळले.
  • स्पुटनिक व्ही’लस टोचल्यानंतर 42 दिवसांनंतरही कोणतेही अन्य गंभीर परिणाम (साइड इफे क्ट्स) जाणवले नाहीत.
  • त्याचप्रमाणे ही लस 21 दिवसांत शरीरामध्ये अ‍ॅण्टिबॉडी तयार करण्यास सक्षम आहे.
  • ‘लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार दोन भाग असलेल्या लशीत दोन अडेनोव्हायरस वेक्टर्स आहेत.
  • त्यामुळे एसएआरएस-सीओव्ही-2 स्पाइक प्रोटिनसाठी वेगळ्या पद्धतीने विकसित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिली:

  • रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) 25,215 कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे.
  • पीटीआयनं हे वृत्त दिलं असून टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या माध्यमातून रिलायन्स जिओ इन्फ्राटेल ताब्यात घेण्यास दूरसंचार खात्यानं ब्रुकफिल्डला मंजुरी दिल्याची माहिती आहे.
  • ब्रुकफिल्ड ही कॅनडास्थित कंपनी असून देशभरातील 1.35 लाख मोबाइल टॉवर्सची विक्री या माध्यमातून होत असल्याचे वृत्त आहे.
  • या प्रस्तावाला अर्थखाते, गृहखाते तसेच मध्यवर्ती बँकेने जुलैमध्ये मान्यता दिल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.
  • मुकेश अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्म्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगामध्ये याआधीही सुमारे 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली होती.

स्टेडियममध्ये 100 जणांना प्रवेशास मुभा:

  • मैदानात प्रेक्षक पुन्हा कधी मोठय़ा संख्येने परततील हे सांगणे सध्या तरी अवघड आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
  • नवीन नियमानुसार 21 सप्टेंबरपासून खेळाच्या ठिकाणी 100 जणांना प्रवेशास मुभा आहे.
  • स्टेडियममध्ये 100 जणांना 21 सप्टेंबरपासून आम्ही परवानगी दिली आहे.

दिनविशेष :

  • 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन तसेच आंतरराष्ट्रीय दान दिन म्हणून पाळला जातो.
  • भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला होता.
  • भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 मध्ये झाला.
  • सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1928 रोजी झाला.
  • सन 1984 मध्ये एस.टी.एस. 41-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.