7 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
7 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2020)
सार्वजनिक क्षेत्रातील 26 कंपन्यांचे केंद्र सरकार करणार खासगीकरण:
- सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून (PSUs) सरकार आपली हिस्सेदारी विकण्यासंदर्भातील योजना तयार करत आहे.
याचसंदर्भात 27 जुलै 2020 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी एक महत्वाची घोषणा करताना केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 23 कंपन्यांचे खासगिकरण करणार असल्याचे सांगितले होते. - माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या एका उत्तरामध्ये सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 23 नाही तर 26 कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
- माहिती अधिकाराअंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरनुसार खालील 26 कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येणार आहे.
1. Project & Development India Limited (PDIL)
2. Engineering Projects India Limited (EPIL)
3. Pawan Hans Limited (PHL)
4. B&R Company Limited (B&R)
5. Air India
6. Central Electronics Limited(CEL)
7. Cement Corporation India Limited CCIL (Nayagaon unit)
8. Indian Medicine & Pharmaceuticals Corporation Ltd. (IMPCL)
9. Salem Steel Plant, Bhadrawati Steel Plant, Durgapur Steel plant
10. Ferro Scrap Nigam Ltd. (FSNL)
11. Nagarnar Steel Plant of NDMC
12. Bharat Earth Movers Limited (BEML)
13. HLL Lifecare
14. Bharat Petroleum Corporation Ltd. (BPCL)
15. Shipping Corporation of India Ltd. (SCI)
16. Container Corporation of India Ltd (CONCOR)
17. Nilachal Ispat Nigam Limited (NINL).
18. Hindustan Prefab Limited (HPL)
19. Bharat Pumps and Compressors Ltd (BCPL)
20. Scooters India Ltd (SIL)
21. Hindustan Newsprint Ltd (HNL)
22. Karnataka Antibiotics & Pharmaceuticals Ltd (KAPL)
23. Bengal Chemicals and Pharmaceuticals Ltd. (BCPL)
24. Hindustan Antibiotics Ltd. (HAL)
25. Indian Tourism Development Corporation (ITDC)
26. Hindustan Fluorocarbon Ltd (HFL)
Must Read (नक्की वाचा):
प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन:
- प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन झालं आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या.
- प्रसिद्ध कवी आणि लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
- मीना देशपांडे या प्रसिद्ध लेखिका असण्यासोबतच आचर्य अत्रे यांच्या कन्या होत्या.
अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत 1.70 लाख कोटी:
- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग कोविड 19 साथीमुळे मंदावला आहे. ही रेल्वे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
- दी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने म्हटले आहे की, आम्ही प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेपैकी 63 टक्के जमीन अधिग्रहित केली आहे.
- गुजरातेत 77 टक्के, दादरा नगर हवेलीत 80 टक्के, महाराष्ट्रात 22 टक्के जमीन अधिग्रहण झाले आहे.
- या प्रकल्पाची किंमत सध्या 1.08 लाख कोटी असली तरी ती आता 1.70 लाख कोटी झाली आहे.
- रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सांगितले की, येत्या तीन ते सहा महिन्यात जमीन अधिग्रहणाची प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट झाल्यानंतर या प्रकल्पाची नवी कालमर्यादा निश्चित केली जाईल.
आंध्र प्रदेशचं पहिलं स्थान कायम- ईज ऑफ डुईंग बिझनेसची रँकिंग:
- राज्यांमध्ये स्पर्धा निर्णाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेसची रँकिंग आज जाहीर करण्यात आलं.
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे रँकिंग जाहीर केलं. यामध्ये सलग दुसऱ्या वर्षीही आंध्र प्रदेशनं आपलं स्थान कायम ठेवलं आहे.
- तर उत्तर प्रदेशनंही मोठी झेप घेत दुसरं स्थान मिळवलं असून तेलंगणला तिसरं स्थान देण्यात आलं आहे.
- 2015 पासून आतापर्यंत रँकिंगमध्ये सर्वाधिक सुधारणा आणण्यात लक्षदीप सर्वात पुढे आहे.
- 2015मध्ये लक्षद्वीप 33 व्या स्थानावर होते. परंतु यावर्षी लक्षद्वीपनं 15 व्या स्थानावर उडी घेतली आहे.
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा सेरेनाने बाजी मारली:
- अमेरिकेचीच युवा टेनिसपटू स्लोआन स्टीफन्सचा अडथळा सेरेना व्हिल्यम्सने ओलांडला.
- अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत सेरेनाने स्टीफन्सला 2-6, 6-2, 6-2असे पराभूत केले.
- विक्रमी 23 ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाने पहिला सेट गमावूनही बाजी मारली.
- सेरेनाने स्टीफन्सविरुद्धच्या 12 लढतींतील 10 लढतींत आता विजयाची नोंद केली आहे.
दिनविशेष:
- आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 मध्ये झाला.
- हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 मध्ये झाला.
- 7 सप्टेंबर 1906 मध्ये बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
- सन 1923 मध्ये इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
- सन 1931 मध्ये दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
- मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात सन 1978 मध्ये यश.