8 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी:
DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी

8 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2020)

DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी:

  • ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली.
  • या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच 6) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.
    हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही चाचणी होती.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने हे व्हेइकल विकसित केले आहे. सकाळी 11 वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला.
  • या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल.
  • डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली. HSTDV चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले.

युनिसेफ ने करोनावरील लस खरेदी आणि पुरवठय़ासाठी पुढाकार घेतला:

  • करोनावर लस उपलब्ध झाली तरी ती कुणाला, कशी व केव्हा उपलब्ध होणार हा सर्वात मोठा प्रश्न असून आता युनिसेफने यात पुढाकार घेऊन लशीची खरेदी व पुरवठा याची जबाबदारी घेतली आहे.
  • दी युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड ’म्हणजे ‘युनिसेफ ’ही जगातील सर्वात मोठी लस खरेदी करणारी संस्था असून ते दरवर्षी विविध लशींचे 2 अब्ज डोस खरेदी करीत असतात.
  • ही संस्था आता ‘रिव्हॉल्विंग फंड ऑफ दी पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या मदतीने कोविड 19 लशींची खरेदी करणार आहे.
  • ‘कोव्हॅक्स ग्लोबल व्हॅक्सिन’ सुविधा त्यासाठी उभारण्यात आली असून त्यात कमी व मध्यम उत्पन्न गटातील 92 देशांना लस दिली जाईल.

2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.

  • करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे.
  • 2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.
  • “2021या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-2 सारखी चांद्रयान-3 मोहिम असेल.
  • चांद्रयान-2 प्रमाणे चांद्रयान-3 तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेलकेंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.
  • सध्या चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे. या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.

स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब  – नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा:

  • सर्जियो रामोस तसेच युवा फुटबॉलपटू अन्सू फाटी यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर स्पेनने नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत युक्रेनवर 4-1 असा दमदार विजय मिळवला.
  • रामोसने तिसऱ्या मिनिटाला पेनल्टीवर आणि 29व्या मिनिटाला गोल झळकावल्यानंतर फाटीने 32व्या मिनिटाला तिसरा गोल केला.
  • स्पेनकडून गोल झळकावणारा तो सर्वात युवा (17 वर्षे 311 दिवस) फुटबॉलपटू ठरला आहे.
  • त्यानंतर फेरान टोरेसने चौथा गोल लगावत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
  • जर्मनीला नेशन्स लीगमध्ये पहिल्या विजयाची उत्सुकता लागली असून रविवारी त्यांना स्वित्झर्लंडने 1-1 असे बरोबरीत रोखले.

दिनविशेष :

  • 8 सप्टेंबरआंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.
  • 8 सप्टेंबरजागतिक शारीरिक उपचार दिन.
  • 8 सप्टेंबर 1954 मध्ये साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना झाली.
  • स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने 8 सप्टेंबर 1962 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.
  • मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून 8 सप्टेंबर 1991 मध्ये स्वतंत्र झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.