5 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
5 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2020)
रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित:
रशियाने विकसित केलेली आणि मंजुरी दिलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’मध्ये या बाबतची संशोधन माहिती समोर आली आहे.
चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस सुरक्षित असल्याचे आढळले.
‘स्पुटनिक व्ही’लस टोचल्यानंतर42 दिवसांनंतरही कोणतेही अन्य गंभीर परिणाम (साइड इफे क्ट्स) जाणवले नाहीत.
त्याचप्रमाणे ही लस 21 दिवसांत शरीरामध्ये अॅण्टिबॉडी तयार करण्यास सक्षम आहे.
‘लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार दोन भाग असलेल्या लशीत दोन अडेनोव्हायरस वेक्टर्स आहेत.
त्यामुळे एसएआरएस-सीओव्ही-2 स्पाइक प्रोटिनसाठी वेगळ्या पद्धतीने विकसित करण्यात आल्याचे म्हटले आहे.
भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिली:
रिलायन्स जिओ इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या (मोबाइल टॉवर्स) 25,215 कोटी रुपयांच्या विक्रीसाठी भारत सरकारनं ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याचं वृत्त आहे.
पीटीआयनं हे वृत्त दिलं असून टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या माध्यमातून रिलायन्स जिओ इन्फ्राटेल ताब्यात घेण्यास दूरसंचार खात्यानं ब्रुकफिल्डला मंजुरी दिल्याची माहिती आहे.
ब्रुकफिल्ड ही कॅनडास्थित कंपनी असून देशभरातील 1.35 लाख मोबाइल टॉवर्सची विक्री या माध्यमातून होत असल्याचे वृत्त आहे.
या प्रस्तावाला अर्थखाते, गृहखाते तसेच मध्यवर्ती बँकेने जुलैमध्ये मान्यता दिल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.
मुकेश अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्म्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगामध्ये याआधीही सुमारे 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली होती.
स्टेडियममध्ये 100 जणांना प्रवेशास मुभा:
मैदानात प्रेक्षक पुन्हा कधी मोठय़ा संख्येने परततील हे सांगणे सध्या तरी अवघड आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
नवीन नियमानुसार 21 सप्टेंबरपासून खेळाच्या ठिकाणी 100 जणांना प्रवेशास मुभा आहे.
स्टेडियममध्ये 100 जणांना 21 सप्टेंबरपासून आम्ही परवानगी दिली आहे.
दिनविशेष :
5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन तसेच आंतरराष्ट्रीय दान दिन म्हणून पाळला जातो.
भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला होता.
भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 मध्ये झाला.
सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1928 रोजी झाला.
सन 1984 मध्ये एस.टी.एस. 41-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.