6 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

भारतीय हॉकी टीम

6 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2021)

पूर्वलक्ष्यी कर अखेर रद्द :

  • पूर्वलक्ष्यी प्रभावाने आकारला जाणारा वादग्रस्त कर रद्द करण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारने घेतला आहे.
  • तर यासंदर्भातील करदुरुस्ती विधेयक गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडले.
  • तसेच या दुरुस्तीनंतर व्होडाफोन व केर्न एनर्जी यासारख्या कंपन्यांनी पूर्वलक्ष्यीप्रभावाने भरलेला कर विनाव्याज परत केला जाईल.
  • जुन्या व नव्या करप्रणालीमध्ये मोठी तफावत असेल आणि जुन्या करपद्धतीतील करांचे दर तुलनेत खूपच कमी असतील तर पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी केली जाते व त्यासंदर्भात नव्या करपद्धतीत तरतूद केली जाते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2021)

कुस्ती मध्ये रवीला रौप्यपदक :

  • रवी कुमार दहिया गुरुवारी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये रौप्यपदक पटकावणारा भारताचा दुसरा मल्ल ठरला.
  • तर उपांत्य फेरीमधील दिमाखदार विजयामुळे सुवर्णपदकासाठी आशा उंचावणाऱ्या रवीचा रशियन ऑलिम्पिक समितीच्या विश्वविजेत्या झॅव्हूर युग्येव्हपुढे निभाव लागला नाही.
  • पुरुषांच्या फ्रीस्टाईल 57 किलो वजनी गटात रवीने 2019च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही झॅव्हूरकडून पराभव पत्करला होता.
  • तसेच गुरुवारी पुन्हा झॅव्हूरने वर्चस्वपूर्ण खेळाचे प्रदर्शन करताना रवीला 7-4 असे नामोहरम केले.
  • तसेच रवीच्या आधी 2012 मध्ये सुशील कुमारने ऑलिम्पिक कुस्तीची अंतिम फेरी गाठताना रौप्यपदक जिंकले होते.

41 वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं कांस्यपदकावर कोरलं नाव :

  • भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे.
  • तर तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे.
  • अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव केला.
  • भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.
  • भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं.
  • आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते.

दिनविशेष :

  • 6 ऑगस्ट हा जागतिक अण्वस्त्रविरोधी दिन तसेच अणुशस्त्र जागृती दिन म्हणून पाळला जातो.
  • 6 ऑगस्ट 1925 हा दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा स्मृतीदिन आहे.
  • सन 1926 मध्ये ‘जेरट्रूड एडर्ले‘ ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.
  • 6 ऑगस्ट 1945 रोजी जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला होता.
  • भारतीय पर्यावरणवादी ‘राजेंद्र सिंग‘ यांचा जन्म 6 ऑगस्ट 1959 रोजी झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2021)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago