6 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
6 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 मे 2020)
करोना व्हायरसवरील औषध निर्मितीमध्ये भारताला महत्वपूर्ण यश :
सध्याच्या घडीला करोना व्हायरसवर अत्यंत परिणामकारक ठरणारे रेमडेसिविर औषध बनवण्याच्या दिशेने भारताने पहिले पाऊल टाकले आहे.
हैदराबाद स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीने रेमडेसिविर औषध बनवण्यासाठी सुरुवातीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती केली आहे. औषधात वापरण्यात येणारे घटकद्रव्य बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.
तसेच उद्या गरज पडली तर भारतात रेमडेसिविर औषधाची निर्मिती सुरु व्हावी, यासाठी IICT ने सिप्ला सारख्या औषध कंपन्यांसाठी टेक्नोलॉजीची प्रात्यक्षिक सुरु केली आहेत. गिलीयड सायन्सेस या औषध कंपनीने रेमडेसिविर औषधाची निर्मिती केली आहे.
तर अमेरिकेत इमर्जन्सीमध्ये या औषधाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रग हे औषध करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी ठरत आहे.
गिलीयड सायन्सेसकडे रेमडेसिविर औषधाचे पेटंट आहे. पेटंट कायद्यानुसार व्यावसायिक वापरासाठी नव्हे, फक्त संशोधनासाठी या औषधाची निर्मिती करता येईल.
इराणने आपले चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने आपले रियाल हे चलन बदलून त्याऐवजी तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर बदललेल्या चलनानुसार एका तोमानची किंमत ही 10 हजार रियाल इतकी असणार आहे.
अमेरिकेने इराणवर टाकलेल्या प्रतिबंधांमुळे मागील काही महिन्यांपासून इराणी चलनाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळालं होतं. हीच घसरण थांबवण्यासाठी इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच सोमवारी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आलं.
दारुवर 70% ‘स्पेशल करोना व्हायरस टॅक्स’:
लॉकडाउनमुळे गेला महिनाभर देशभरात दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र, सोमवारपासून ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली.
त्यानंतर सर्वत्र दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी दुकानं बंद करावी लागली. दिल्लीमध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आता दिल्लीच्या केजरीवाल सरकारने दारुवर ‘स्पेशल करोना टॅक्स’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली सरकारने दारू विक्रीवर 70 टक्के करोना व्हायरस कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्पेशल करोना फी’अंतर्गत हा कर मंगळवारपासून आकारला जाईल. यानुसार ‘एमआरपी’वर 70% स्पेशल करोना टॅक्स आकारला जाणार आहे.
सोमवारी रात्री उशीरा याबाबतचा आदेश दिल्ली सरकारने काढला. मंगळवारी सकाळपासून हा नियम लागू होईल. दारुच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यास तिथे विक्रीला परवानगी देणार नाही, असा इशाराही केजरीवाल यांनी यापूर्वी दिला आहे.
याशिवाय, मंगळवारपासून दिल्लीमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत दारु विक्रीची दुकानं सुरू ठेवायला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रकिया सुरू :
न्यायालयात दाखल होणारी प्रकरणे ई-फायलिंग पद्धतीने दाखल करतायावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून राज्यात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांची यादी मागविण्यात आली आहे, अशी माहिती बार कौन्सिलतर्फे देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटीकडून या आराखड्यावर सध्या काम सुरू आहे. या कमिटीकडून बार कौन्सिल ऑफ इंडियाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र बरोबरच देशातील इतर राज्यांत कडूनही यासाठी माहिती मागविण्यात आली आहे . ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर कोर्टात दाखल होणारे दावे ई-फायलिंग द्वारे कसे दाखल करता येतील याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील वकिलांची माहिती गोळा करण्यासाठी तसेच ई-फायलिंग या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच बैठक घेण्यात आली अशी माहिती कौन्सिलचे सदस्य अड. राजेंद्र उमाप यांनी दिली.
राज्यातील व परराज्यातील माहिती गोळा करण्यात आल्यानंतर ही माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटी कडे येणार आहे. त्या नंतर पुढील आराखडा तयार केला जाणार आहे. ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर प्रत्येक वकीलाला तालुका, जिल्हा, हायकोर्ट, आणि सुप्रीम कोर्टातही ई फाइलिंग द्वारे दावे दाखल करता येऊ शकणार आहेत, असे ही अड. उमाप यांनी सांगितले.
दी अँकरेज डेली, प्रो पब्लिका यांना पत्रकारितेतील पुलित्झर पुरस्कार :
अलास्कातील एक तृतीयांश खेडय़ात सार्वजनिक सुरक्षा नसून तेथे पोलीस संरक्षण नावाचा प्रकारच अस्तित्वात नसल्याची वृत्तमालिका प्रकाशित करणाऱ्या दी अँकरेज डेली न्यूज, प्रो पब्लिका या वृत्तपत्रांना पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ला शोध पत्रकारितेसाठी या पुरस्काराने गौरवण्यात आले असून त्यांनी न्यूयॉर्क शहरातील टॅक्सी उद्योगातील कर्ज व्यवस्थेचा पर्दाफाश केला होता.
तर रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारबाबत जोखीम पत्करून केलेल्या आंतरराष्ट्रीय वार्ताकनासाठीही ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ला गौरवण्यात आले आहे.
‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ला स्पष्टीकरणात्मक वार्ताकनासाठी हा पुरस्कार मिळाला असून उच्च तापमानामुळे होणाऱ्या पर्यावरण हानीचा विचार त्यांनी मांडला होता.
‘असोसिएटेड प्रेस’ला छायाचित्रांकनासाठी वृत्तछायाचित्र पुरस्कार मिळाला असून त्यात भारताने अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतरच्या परिस्थितीतील छायाचित्रांचा समावेश आहे.
रॉयटर्सला हाँगकाँगमधील आंदोलनाच्या छायाचित्रांसाठी ब्रेकिंग न्यूज छायाचित्र पुरस्कार मिळाला आहे. कोलंबिया विद्यापीठ हा पुरस्कार देत असते. पत्रकारितेत दिले जाणारे हे पुरस्कार पहिल्यांदा 1917 मध्ये दिले गेले होते.
दिनविशेष :
6 मे : आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन
पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट 6 मे 1840 मध्ये प्रसारित झाले.
पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्घाटन 6 मे 1889 मध्ये झाले.
ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु 6 मे 1949 मध्ये झाले.
6 मे 1954 मध्ये रॉजर बॅनिस्टर हे 1 मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा 6 मे 1983 मध्ये लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
6 मे 1997 मध्ये बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.