7 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2022)
उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड :
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड विजयी झाले असून त्यांनी विरोधी पक्षांच्या सर्वसंमत उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा अपेक्षेप्रमाणे पराभव केला.
उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत 93 टक्के मतदान झाले.
धनखड यांना 528 मते मिळाली, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. धनखड यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 73 एवढी आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी संसदेच्या दोन्ही सदनांतील सदस्यांना मतदान करता येते.
पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये रोजी झाला.
7 ऑगस्ट 1941 हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार‘ हे वृत्तपत्र सन 1981 मध्ये बंद पडले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.