Current Affairs (चालू घडामोडी)

8 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जीवन

8 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 एप्रिल 2020)

भारतीय रेल्वेने आठवडयाभरात व्हेंटिलेटर बनवून दाखवलं :

  • भारतीय रेल्वेच्या रेल कोच फॅक्टरीने व्हेंटिलेटरचा प्रोटोटाइप तयार केला आहे. कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरीमध्ये व्हेंटिलेटरचा प्रोटोटाइप म्हणजे प्रतिकृती बनवण्यात आली आहे.
  • तर रेल्वेने ट्रेनचे डबे क्वारंटाइन सेंटरमध्ये बदलले आहेत. तिथे या व्हेंटिलेटरचा उपयोग करण्याची योजना आहे.
  • तसेच व्हेंटिलेटर बनवण्याचा प्रयत्न करा, असे निर्देश सरकारकडून मिळाल्यानंतर आठवडयाभराच्या आता रेल्वेने या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे.
  • रेल्वेने बनवलेल्या व्हेंटिलेटरच्या प्रोटोटाइपला ‘जीवन’ नाव देण्यात आले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च म्हणजे आयसीएमआर या व्हेंटिलेटरची अंतिम चाचणी करणार आहे. चाचणी यशस्वी ठरली आणि ICMR कडून
    मान्यता मिळाली तर रेल्वेशी संबंधित देशभरातील विभागांमध्ये ‘जीवन’ची निर्मिती सुरु होईल.
  • तर रेल कोच फॅक्टरीतील वैद्यकीय तज्ज्ञांनी या प्रोटोटाइपची चाचणी घेतली असून, त्यांनी आपली मंजुरी दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 एप्रिल 2020)

भारताने 24 औषधांच्या निर्यातीवरील हटवले निर्बंध :

  • भारताने 24 औषधं आणि औषध निर्मिती घटकांच्या निर्यातीवर असलेले निर्बंध उठवले आहेत. सरकारक़डून ही माहिती देण्यात आली आहे.
  • तर भारत जेनेरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या पुरवठयावरुन इशारा दिला होता. करोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर
    मागच्या महिन्यात काही औषधांच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते.
  • औषध पुरवठयाच्या साखळीमध्ये कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, यासाठी परस्परांच्या संपर्कात राहण्याचे दोन्ही नेत्यांमध्ये ठरले आहे. व्हाइट हाउसचे प्रवक्त्यांनी शनिवारी टि्वट करुन ही माहिती दिली होती. भारताने टेस्टिंग किट,
    व्हेंटिलेटर, मास्क आणि अन्य सुरक्षा उपकरणे यांच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.
  • करोना व्हायरसच्या उपचारांमध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या गोळया प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली, त्यावेळी या औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्याची विनंती केली होती.

मोदी सरकार कृषी, लघु-मध्यम उद्योगांसह ‘या’ क्षेत्रांना देणार दिलासा :

  • करोनाच्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता सर्वच क्षेत्र ठप्प आहेत. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून,
    लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारनं तयारी सुरू केली आहे.
  • तर यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयानं एक समिती नेमली आहे. कृषीसह इतर उद्योगांना मदत देण्यासाठी सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.
  • करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउन लागू होऊन 14 झाले आहेत.
  • दरम्यान, या निर्णयानंतर केंद्र सरकारनं पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत 1 लाख 70 हजार कोटींच पॅकेज जाहीर केलं होतं. यात शेतकऱ्यांपासून ते दररोज काम करुन उदरर्निवाह करणाऱ्या कामगारांना मदतीची घोषणा करण्यात आली
  • होती. त्यानंतर सरकारनं लॉकडाउनमुळे फटका बसलेल्या इतर क्षेत्रांना मदतीचा हात देण्याचं काम सुरू केलं आहे. पुढील काही दिवसात या पॅकेजची केंद्राकडून घोषणा केली जाऊ शकते.

SBIची पुन्हा एकदा व्याजदरात कपात:

  • देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पुन्हा एकदा ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
  • एसबीआयने मंगळवारी कर्जावरील दर (एमसीएलआर)च्या मार्जिन कॉस्टमध्ये 35 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.35 टक्क्यांनी कपात केली आहे. नवीन दर 10 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
  • यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने(आरबीआय) दिलेल्या सल्ल्यानुसार पॉलिसी रेटचा पूर्ण फायदा एसबीआयने 27 मार्च रोजी ग्राहकांना दिला होता. एसबीआयने देखील एक्सटर्नल आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 75-75 बेस पॉइंटने म्हणजे 0.75 टक्क्यांनी कमी केला होता.
  • एसबीआयने एमसीएलआरच्या दरात कपात केल्यानंतर बँकेचा एक वर्षाचा एमसीएलआर 7.75 टक्क्यांवरून 7.40 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. किरकोळ कर्ज आणि वर्षभराच्या कालावधीसाठी हा कर्जावरील दर ठरवला जातो. बँकेने बचत खात्यांच्या ठेवीवरील व्याजदरही 0.25 टक्क्यांनी कमी करून 2.75 टक्क्यांवर आणल्याची घोषणा केली आहे.

दिनविशेष :

  • 8 एप्रिल आंतरराष्ट्रीय रोमानी दिन
  • 1911 मध्ये डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
  • आचार्य विनोबा भावे यांनी 1921 मध्ये ‘पवनार’ आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
  • भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील 1929 मध्ये सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
  • 1950 मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
  • मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात 1993 मध्ये सामील झाले.
  • 1857च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 एप्रिल 2020)

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago