Current Affairs (चालू घडामोडी)

8 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

अमेरिकेतल्या Infosys कर्मचाऱ्यांना चार्टर्ड विमानाने भारतात आणलं:

8 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 जुलै 2020)

अमेरिकेतल्या Infosys कर्मचाऱ्यांना चार्टर्ड विमानाने भारतात आणलं:

  • देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस लिमिटेडने अमेरिकेतील आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष विमानाने भारतात आणलं आहे.
  • अमेरिकेतील 76 कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा 206 जणांना स्पेशल चार्टर्ड विमानाने कंपनीने भारतात आणलं.
  • भारतात परतलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांचा व्हिसा संपला होता , तर काही जणांचा व्हिसा लवकरच संपणार होता. कंपनीने सॅन फ्रॅन्सिस्को इथून या कर्मचाऱ्यांना स्पेशल चार्टर्ड विमानाने बंगळुरूमध्ये आणलं.
  • तर 200 पेक्षा जास्त जणांना आणण्यासाठी आम्ही स्पेशल चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली ही माहिती देताना विमान बंगळुरूमध्ये पोहोचलं आहे”, अशी पोस्ट कंपनीचे असोसिएट व्हीपी (associate vice-president)संजीव बोडे यांनी शेअर केली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 जुलै 2020)

 लष्करात महिला अधिकाऱ्यांना ‘कायम नियुक्ती’ देण्यास मुदतवाढ:

  • लष्करात सध्या असलेल्या शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशनवर असलेल्या महिला अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती (परमनंट कमिशन) देण्याच्या निकालाची अंमलबजावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मंगळवारी एकमहिना मुदतवाढ दिली आहे.
  • न्या.धनंजय चंद्रचूड व न्या. इंदू मल्होत्रा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचे सरकारला पालन करावे लागेल.
  • 17 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निकालात म्हटले होते की, लष्करातील महिला अधिकाऱ्यांना परमनंट कमिशन देण्यात यावे व त्यांना लष्करी कमांड मधील पदे देण्यात यावीत.

अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय-सीबीएसई बोर्डा :

  • व्हायरसमुळे सीबीएसई बोर्डाने 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी नववी ते 12 वी इयत्तेचा अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी करण्याचा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
  • सीबीएसईला नववी ते 12 इयत्तेपर्यंतच्या अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता” असे डॉ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितले. ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत.

तांबे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार:

  • कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) त्रिनबॅगो नाइट रायडर्स संघातून खेळण्यास लेग-स्पिनर प्रवीण तांबेला आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) रोखू शकणार नाही.
  • कारण त्याने दुसऱ्यांदा अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली आहे.
  • 48 वर्षीय तांबे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. कारण त्याने ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे.
  • ‘मुंबई क्रिकेट संघटनेकडे प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार तांबे निवृत्त क्रिकेटपटू आहे. कारण त्याने संघटनेला ई-मेल पाठवून याविषयी कळवले आहे,’’ असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. तांबेने 33 ‘आयपीएल’ सामन्यांत 30.5च्या सरासरीने 28 बळी मिळवले आहेत.

दिनविशेष :

  • 8 जुलै 1497 ला वास्को द गामा भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
  • 8 जुलै 1889 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 8 जुलै 1910 ला मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
  • रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी 8 जुलै 2006 मध्ये चलनात आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 जुलै 2020)

Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago