8 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
8 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2020)
DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी:
ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली.
या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच 6) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही चाचणी होती.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने हे व्हेइकल विकसित केले आहे. सकाळी 11 वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला.
या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल.
डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली. HSTDV चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले.
युनिसेफ ने करोनावरील लस खरेदी आणि पुरवठय़ासाठी पुढाकार घेतला:
करोनावर लस उपलब्ध झाली तरी ती कुणाला, कशी व केव्हा उपलब्ध होणार हा सर्वात मोठा प्रश्न असून आता युनिसेफने यात पुढाकार घेऊन लशीची खरेदी व पुरवठा याची जबाबदारी घेतली आहे.
‘दी युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड ’म्हणजे ‘युनिसेफ ’ही जगातील सर्वात मोठी लस खरेदी करणारी संस्था असून ते दरवर्षी विविध लशींचे 2 अब्ज डोस खरेदी करीत असतात.
ही संस्था आता ‘रिव्हॉल्विंग फंड ऑफ दी पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या मदतीने कोविड 19 लशींची खरेदी करणार आहे.
‘कोव्हॅक्स ग्लोबल व्हॅक्सिन’ सुविधा त्यासाठी उभारण्यात आली असून त्यात कमी व मध्यम उत्पन्न गटातील 92 देशांना लस दिली जाईल.
2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.
करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे.
2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.
“2021या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-2 सारखी चांद्रयान-3 मोहिम असेल.
चांद्रयान-2 प्रमाणे चांद्रयान-3 तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल” केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.
सध्या चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे. या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.
स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब – नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा:
सर्जियो रामोस तसेच युवा फुटबॉलपटू अन्सू फाटी यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर स्पेनने नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत युक्रेनवर 4-1 असा दमदार विजय मिळवला.
रामोसने तिसऱ्या मिनिटाला पेनल्टीवर आणि 29व्या मिनिटाला गोल झळकावल्यानंतर फाटीने 32व्या मिनिटाला तिसरा गोल केला.
स्पेनकडून गोल झळकावणारा तो सर्वात युवा (17 वर्षे 311 दिवस) फुटबॉलपटू ठरला आहे.
त्यानंतर फेरान टोरेसने चौथा गोल लगावत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
जर्मनीला नेशन्स लीगमध्ये पहिल्या विजयाची उत्सुकता लागली असून रविवारी त्यांना स्वित्झर्लंडने 1-1 असे बरोबरीत रोखले.
दिनविशेष :
8 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.
8 सप्टेंबर – जागतिक शारीरिक उपचार दिन.
8 सप्टेंबर 1954 मध्ये साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना झाली.
स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने 8 सप्टेंबर 1962 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.
मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून 8 सप्टेंबर 1991 मध्ये स्वतंत्र झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.