23 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

कर्णधार विराट कोहली
कर्णधार विराट कोहली

23 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 फेब्रुवरी 2020)

विराट कोहलीचा विक्रम :

  • टीम इंडियाच्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं जोरदार फटकेबाजी केली. केन विलियम्सन आणि रॉस टेलर या अनुभवी जोडीनं किवींना आघाडी मिळवून दिली. पण, हे दोघं माघारी परतल्यानंतर किवींच्या डाव गडगडण्यास सुरुवात झाली.
  • तसेच आर अश्विननं न्यूझीलंडचा पाचवा फलंदाज माघारी पाठवला. कर्णधार विराट कोहलीनं स्लीपमध्ये झेल टिपला. विराटनं यासह नव्या विक्रमाला गवसणी घातली. विशेष म्हणजे हा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या खेळात, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिग्गज भारतीय खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने स्लिपमध्ये हेन्री निकोल्सचा झेल पकडला.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला कोहलीचा हा 250 वा झेल ठरला. यासह विराट कोहलीने अझरुद्दीन-द्रविड आणि सचिन यांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

विंडीजचा माजी कर्णधार पाकिस्तानचं नागरिकत्व स्विकारण्याच्या तयारीत :

  • वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी पाकिस्तानचं नागरिकत्व स्विकारण्याच्या तयारीत आहे.
  • पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेतील पेशावर झलमी संघाच्या मालकांनी सॅमीचा अर्ज पाक राष्ट्रपतींकडे पाठवलेला आहे. सॅमी पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेत पेशावर संघाचं प्रतिनिधीत्व करतो.
  • तसेच सध्या पाक राष्ट्रपतींच्या कार्यालयात हा अर्ज पोहचलेला आहे. पाक क्रिकेट बोर्डाकडून यासाठी शिफारसीची गरज लागणार आहे, यासाठी मी विनंतीही केली आहे. पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांकडून शिफारस आल्यानंतर सॅमीच्या नागरिकत्वाबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो.
  • पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्व हंगामांमध्ये सॅमीने सहभाग घेतला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झाल्यानंतर सॅमीनेही आनंद व्यक्त केला होता.

राम मंदिर उभारणीसाठी सरकारकडून निधी घेणार नाही :

  • अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी सरकारकडून निधी घेतला जाणार नाही, जनतेच्या योगदानातून मंदिराची निर्मिती होणार असल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट) चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितलं आहे.
  • तर याचबरोबर सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना भव्य राम मंदिराच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी अयोध्येत बोलवले जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
  • महंत नृत्य गोपाल दास म्हणाले, आम्ही अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलं आहे, आमच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या नात्याने योगी आदित्यनाथ देखील आहेत. याशिवाय आम्ही धार्मिक कार्यात रस असणाऱ्या इतर राज्याच्या मुख्यमंत्री व राज्यपालांनाही मंदिराच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी बोलवणार आहोत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना देखील बोलवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
  • अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. दिल्लीत पार पडलेल्या ट्रस्टच्या पहिली बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
  • तर, विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची सरचिटणीस म्हणून निवड केली गेली आहे.यावेळी अन्य निवडी देखील करण्यात आल्या, खजिनदारपदी स्वामी गोविंद देवगिरी यांची निवड केली गेली. तर, भवन निर्माण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद मिश्रा यांना देण्यात आलेली आहे.

प्रियंका चोप्रा ठरली नंबर वन, केला नवा विक्रम :

  • प्रियंका चोप्राने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवले. आता प्रियंकाने आणखी एक उपलब्धी आपल्या नावे केली आहे. होय, इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड सेलिब्रिटी होण्याचा मान प्रियंकाच्या वाट्याला आला आहे.
  • तसेच इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीयांच्या यादीत प्रियंका दुस-या क्रमांकावर (पहिल्या क्रमांकावर विराट कोहली – 5.3 कोटी फॉलोअर्स) आहे.
  • तर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत ती अव्वल आहे. इन्स्टाग्रामवर प्रियंकाचे 4.99 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
  • इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत प्रियंकाने दीपिका पादुकोणला मागे टाकले आहे. दीपिकाचे 4.42 फॉलोअर्स आहेत.
  • पाठोपाठ आलिया भटचे 4.32 कोटी तर अक्षय कुमारचे 3.68 कोटी फॉलोअर्स आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रियंका एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यासाठी तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये घेते.

दिनविशेष:

  • सन 1455 या वर्षी पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले होते.
  • देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला होता.
  • सन 1947 मध्ये आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना झाली.
  • संसदेने सन 1952 मध्ये कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
  • कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ सन 1996 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.