28 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs
28 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 डिसेंबर 2020)
आरसीपी सिंह ‘जेडीयू’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष :
- बिहारची राजधानी पाटणा येथे पार पडलेल्या जनता दल यूनायटेड(जदयू)च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला.
- नितीश कुमार यांनी जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष पद माजी आयएएस व राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांच्याकडे सोपवलं आहे.
- तर 2016 मध्ये शरद यादव यांनी पक्ष सोडल्यापासून नितीश कुमार यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद होतं.
- तसेच राजकारणात येण्या अगोदर ते प्रशासकी सेवेत होते.ते उत्तर प्रदेश केडरमधून आयएएस होते. रामपूर, बाराबंकी, हमीरपूर आणि फतेहपूर येथे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
Must Read (नक्की वाचा):
मिलिंद नार्वेकर ‘एमपीएल’च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष :
- मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आगामी मुंबई प्रीमियर लीग ट्वेन्टी-20 क्रिकेटसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी साहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
- तर सुरेश सामंत यांना या समितीचे सदस्यत्व देण्यात आले आहे.
- अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड अशा अनेक नेत्यांची ‘एमसीए’च्या उपसमित्यांवर नेमणूक झाली आहे.
- तर पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख आणि आशीष शेलार यांनी तर ‘एमसीए’चे अध्यक्षपद भूषवले आहे.
ICC च्या संघात भारतीयांचा बोलबाला :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. दशकातील सर्वोत्तम 11 खेळाडूंची आयसीसीनं निवड केली आहे.
- तर अभिमानाची बाब म्हणजे या तिन्ही संघाचं नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे आहे.
- एकदिवसीय आणि टी-20 संघाचं कर्णधारपद धोनीकडे सोपवण्यात आलं आहे. तर कसोटी संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली आहे.
- तसेच तिन्ही संघामध्ये स्थान पटकावणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे. विराट कोहलीला टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे.
जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई :
- यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य अशा विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स एसयूव्ही, कार, मोटरसायकल आणि अन्य गाड्यांच्या नंबर प्लेटसवर लावले जातात. त्यातून एक प्रकारचं सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न दिसतो.
- पण आता उत्तर प्रदेशच्या वाहतूक विभागाने अशा प्रकारे नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगणाऱ्या गाड्यांवर कारवाई सुरु केली आहे.
- तर पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना मिळाल्यानंतर वाहतूक विभागाने हे पाऊल उचलले आहे.
- तसेच उत्तर प्रदेशत आता जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्या जप्त करण्यात येणार आहेत.
दिनविशेष:
- सन 1836 मध्ये स्पेनने मेक्सिको या देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष सन 1846 मध्ये स्थापन झाला.
- प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेयरमन ‘धीरूभाई अंबानी‘ यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी झाला होता.
- टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.
- सन 1948 मध्ये मुंबई मध्ये कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.