14 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

ड्रोन
ड्रोन

14 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2021)

देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र केरळमध्ये :

  • ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालेला असताना केरळ पोलिसांचे ‘ड्रोन फोरेन्सिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र’येथे सुरू झाले आहे.
  • तर पाकिस्तानने अलीकडेच जम्मूत केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे हे केंद्र ड्रोन प्रकरणांमधील तपासात सहायक ठरू शकणार आहे.
  • तसेच पोलीस सूत्रांनी सांगितले की, मानवरहित ड्रोनचे इतर सकारात्मक वापर आहेत, त्याचाही अभ्यास यात केला जाणार आहे.
  • पोलिसांसह सर्वच सुरक्षा दलांना हे ड्रोन आव्हान बनले आहेत. केरळ पोलिसांची आता ड्रोन हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये तपासात मदत होऊ शकणार आहे.
  • बेकायदेशीर ड्रोन विमाने ओळखणे हाच केवळ नवीन संस्थेचा उद्देश असून ड्रोनची निर्मितीही केली जाणार आहे.
  • दैनंदिन पोलीस गस्तीसाठीही ही नवी सुविधा वापरली जाणार असल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2021)

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी स्वदेशी लसीला मंजुरी :

  • करोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक स्वदेशी लस विकसित होत आहे. भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पुढील टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारत बायोटेकेने विकसित केलेल्या नाकातून देण्यात येणाऱ्या लसीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली आहे.
  • लस निर्मितीत बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि त्याच्या पीएसयू बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (बीआयआरएसी)ने मदत केली आहे.
  • तर या लसीचं नाव बीबीव्ही154 असं आहे. ही इंटरनेझल म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारी लस आहे.
  • तसेच नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या मदतीने लसीकरण आणखीन सोप्प्या पद्धतीने करता येणार आहे. या लसीमुळे लसीच्या कुप्या, इंजेक्शन, सुया यांचा खर्च वाचवणार आहे.

देशात 1 जुलै 2022 पासून एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी :

  • पर्यावरण मंत्रालयाने पुन्हा एकदा एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
  • 1 जुलै 2022 पासून एकल वापरातील प्लास्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तर यासाठी सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2021 अधिसूचित केला आहे.
  • तसेच एकेरी वापराच्या प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
  • ध्वज, फुगा, आइसक्रिम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकॉल याचा समावेश आहे. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवर प्लास्टिक रॅप अशा वस्तूंचा समावेश आहे.
  • प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी 30 सप्टेंबर 2021 पासून 50 मायक्रॉनवरून 75 मायक्रॉन करण्यात येणार आहे.
  • 31 डिसेंबर 2022 पासून ही जाडी 120 मायक्रॉन केली जाणार आहे.

थॉमस डेनरबी महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक :

  • भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी थॉमस डेनरबी यांची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने केली.
  • स्वीडनचे थॉमस यापूर्वी भारताच्या कुमारी संघाचे प्रभारी प्रशिक्षक होते.
  • तर त्यांच्याकडे 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एएफसी आशियाई चषक स्पध्रेसाठी भारताच्या संघ बांधणीची जबाबदारी दिली होती.
  • तसेच भारताच्या महिला फुटबॉल संघाचे राष्ट्रीय शिबीर 16 ऑगस्टपासून झारखंडला सुरू होणार आहे.

उन्मुक्तचा निवृत्तीचा निर्णय :

  • भारताच्या युवा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
  • तर चंदला आता अमेरिकेतील ट्वेन्टी-20 लीगमध्ये खेळायचे असल्याने त्याने भारतीय क्रिकेटशी संलग्न सर्व क्रिकेट प्रकाराला अलविदा केला.
  • 2012मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत चंदच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपदावर नाव कोरले होते.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम फेरीत चंदनेच नाबाद 111 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. परंतु चंदला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाही.

दिनविशेष :

  • 14 ऑगस्ट हा ‘संस्कृत दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन 1943 मध्ये सन्माननीय डी.लिट. पदवी दिली.
  • लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून 14 ऑगस्ट 1947 रोजी नेमणूक झाली होती.
  • सन 1958 मध्ये एअर इंडियाची दिल्ली-मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.