27 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

डेस्मंड टुटू
डेस्मंड टुटू

27 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2021)

केंद्राच्या सर्वोत्तम प्रशासन यादीत गुजरात अव्वल स्थानी :

  • देशातील सर्व राज्यांमध्ये प्रशासनाच्या गुणवत्तेनुसार त्यांची यादी दरवर्षी केंद्र सरकारकडून तयार केली जाते.
  • तर ही यादी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शनिवारी 25 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली.
  • तसेच या यादीमध्ये देशातील सर्वोत्तम प्रशासनानुसार राज्यांचा क्रम लावण्यात येतो.
  • उत्तम प्रशासन दिनाच्या निमित्ताने ही यादी जाहीर करण्यात आली असून त्यानुसार गुजरात राज्यानं एकूण 58 निर्देशांकांमध्ये उत्तम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
  • तर या यादीनुसार गेल्या वर्षभरात जवळपास 20 राज्यांनी त्यांचा GGI अर्थात गुड गव्हर्नन्स इंडेक्स दर्जा सुधारला आहे.
  • या यादीनुसार गुजरातनं 2019च्या तुलनेत गेल्या वर्षभरात 12.3 टक्क्यांची वाढ नमूद केली आहे.
  • त्यामध्ये आर्थिक प्रशासन, मनुष्यबळ विकास, सार्वजनिक सोयीसुविधा, समाज कल्याण आणि विकास, न्यायव्यवस्था, सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
  • ही यादी बनवण्यासाठी केंद्राकडून एकूण 10 क्षेत्र आणि त्यातील 58 निर्देशांकांची तपासणी केली जाते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2021)

डेस्मंड टुटू यांचे निधन :

  • दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीचे अध्वर्यू आणि देशातील वांशिक पक्षपाताविरुद्ध दिलेल्या लढय़ासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचे रविवारी निधन झाले.
  • दक्षिण आफ्रिकेतील सध्या हयात असलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्यांपैकी ते अखेरचे होते.
  • दक्षिण आफ्रिकेतील धर्मगुरू व कार्यकर्ते असलेले डेस्मंड टुटू यांना वर्णभेदविरुद्ध अिहसक लढा दिल्याबद्दल 1984 साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते.
  • तर त्या राजवटीच्या काळय़ा दिवसांत झालेल्या अत्याचारांचा छडा लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचे ते अध्यक्ष होते.

नागालॅण्डमधून ‘अफ्स्पा’ कायदा मागे घेण्याच्या हालचाली सुरू :

  • जवानांनी केलेल्या गोळीबारात सहा खाणमजुरांसह 13 नागरिकांचा मृत्यू झाला.
  • त्यामुळे नागालॅण्डमधून सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) मागे घेण्याची संतप्त मागणी होत असल्याने त्याबाबत केंद्र सरकारने एक समिती नियुक्त केल्याची माहिती नागालॅण्डचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी रविवारी दिली.
  • तर ही पाचसदस्यीय समिती वादग्रस्त ‘अफ्स्पा’ मागे घेण्याबाबत अभ्यास करून आपल्या शिफारशी 45 दिवसांत सादर करील.
  • नागालॅण्डचा अस्वस्थ क्षेत्रात केलेला समावेश रद्द करून तेथून ‘अफ्स्पा’ कायदा मागे घ्यायचा की तो यापुढेही लागू ठेवायचा याबाबत ही समिती अहवाल सादर करणार आहे.

दिनविशेष:

  • उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा 27 डिसेंबर 1797 मध्ये आग्रा येथे जन्म झाला होता.
  • रेबीज किंवा हाइड्रोंफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ ‘लुई पाश्चार‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1822 मध्ये झाला होता.
  • विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री ‘पंजाबराव देशमुख‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 मध्ये झाला होता.
  • सन 1945 मध्ये 28 देशांनी एकत्रिक जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.