10 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs
10 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 मे 2022)
न्या. धुलिया, न्या. पारडीवाला यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ :
- गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधांशु धुलिया व गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जमशेद पारडीवाला यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.
- सर्वोच्च न्यायालयाच्या विस्तारित इमारत परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी या दोन्ही न्यायमूर्तीना पदाची शपथ दिली.
- न्या. धुलिया व न्या. पारडीवाला यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयाची 34 न्यायाधीशांची संपूर्ण क्षमता पुन्हा बहाल झाली आहे.
- अर्थात, न्या. विनीत सरन हे 10 मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने ही क्षमता पुन्हा 33 वर येईल.
- उत्तराखंडमधून पदोन्नत होणारे दुसरे न्यायाधीश असलेले न्या. धुलिया यांचा कार्यकाळ तीन वर्षांहून थोडा अधिक राहणार आहे.
- आणखी दोन न्यायाधीशांच्या नियुक्तीसोबतच, सरन्यायाधीशांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या 11 न्यायमूर्तीना शपथ दिली असून, हा एक प्रकारचा विक्रम आहे.
Must Read (नक्की वाचा):
ओडिसा-आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार ‘असनी’ चक्रीवादळ :
- शनिवारी रोजी अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाने सोमवारी वेग घेतला आहे.
- तर या चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळामध्ये झालं आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
- हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ सध्या अंदमान निकोबार बेटांपासून 270 किलोमीटर, पोर्टब्लेअरपासून 450 कि.मी., तर आंध्रप्रदेश व पुरीपासून 610 कि.मी. अंतरावर खोल समुद्रात आहे.
- मंगळवारी हे चक्रीवादळ उत्तर आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर पोहोचणार आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा :
- श्रीलंकेत सध्या सुरु असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे.
- राजीनामा देण्यापूर्वी राजपक्षे यांनी जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
- संकटग्रस्त सरकारचे नेतृत्व करणारे राष्ट्रापती गोटाबाया राजपक्षे यांना सध्याच्या राजकीय गोंधळाचे निराकरण आणि अंतरिम प्रशासन तयार करण्यासाठी महिंदाचा राजीनामा हवा होता.
अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक :
- भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ अयोध्येत चौक बांधण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या प्रशासनाला यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
- मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशात पुढील 15 दिवसांत अयोध्येतील एका मोठ्या चौकाची ओळख करून दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावे, असे म्हटले आहे.
- एवढेच नाही तर लताजींनी गायलेली भगवान राम आणि हनुमानाची गाणी आणि भजन शहरात ठीक ठिकाणी स्पीकरवर वाजवावेत.
- रामजन्मभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील अयोध्येतील मुख्य चौकांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जातं आहे.
केंद्र सरकार देशद्रोह कायद्याचा फेरविचार करणार :
- केंद्र सरकारने सोमवारी देशद्रोह कायद्यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
- देशद्रोह कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार आणि चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे केंद्राने म्हटले आहे.
- जोपर्यंत सरकार चौकशी करत नाही तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी करू नये, अशी विनंती सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
- सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशद्रोहाच्या भारतीय दंड संहितेच्या कलम 124 अ च्या वैधतेची तपासणी आणि पुनर्विचार केला जाईल.
भारतात महिलांवर होणाऱ्या हिंसाचारात 30 टक्क्यांनी वाढ :
- राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने एक धक्कादायक बाब समोर आणली आहे.
- त्यांनी केलेल्या सर्वेक्षण अहवाल-5 (NFHS) नुसार, भारतात महिलांवर होणाऱ्या शाररिक हिंसाचारात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी हा अहवाल जाहीर केला.
- निराशाजनक बाब म्हणजे केवळ 14 टक्के महिलांनीच या हिंसाचाराविरोधात आवाज उठवला आहे.
- महिलांवर हिंसाचार होणऱ्या घटनांमध्ये कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.
- त्यापाठोपाठ बिहार, तेलंगणा, मणिपूर आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.
- तर लक्षद्वीपमध्ये महिलांवरील घरगुती हिंसाचार होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे.
धोनीने रचला नवा विक्रम :
- आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 55 व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला धुळ चारली.
- तर या सामन्यात चेन्नईचा तब्बल 91 धावांनी विजय झाला.
- दरम्यान या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने अनोखा विक्रम रचला आहे.
- तर हा विक्रम नोंदवत थेट विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान मिळवलंय.
- दिल्लीविरोधातील सामन्यात 40 वर्षीय महेंद्रसिंह धोनी 18 वे षटक सुरु असताना मैदानात आला. त्याच्या वाट्याला फक्त 8 चेंडू आले.
- तर या आठ चेंडूंमध्ये त्याने 21 धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार लगावत त्याने ही किमया साधली.
थॉमस चषक बॅडिमटन स्पर्धात भारतीय संघ बाद फेरीत :
- भारतीय पुरुष संघाने सोमवारी कॅनडाला 5-0 अशी धूळ चारताना थॉमस चषक बॅडिमटन स्पर्धेच्या साखळी फेरीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
- तर या कामगिरीसह त्यांना या स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात यश आले.
- भारतीय संघाने आपल्या पहिल्या लढतीत जर्मनीला 5-0 असे नमवले होते.
- त्यामुळे भारताचे ‘क’ गटात अव्वल दोन संघांतील स्थान निश्चित आहे.
दिनविशेष :
- लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी 10 मे 1824 मध्ये खुली करण्यात आली.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव 10 मे 1907 रोजीलंडनमधे साजरा केला.
- रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म 10 मे 1918 रोजी झाला होता.
- 10 मे 1993 रोजी संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.