5 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
5 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2018)
तीन न्यायाधीशांच्या नेमणुकीस राष्ट्रपतींची मंजुरी :
- उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नेमणूक करण्याच्या आदेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.
- उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ, मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी, ओदिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विनीत सरण यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
- आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 25 झाली असून सहा जागा अजूनही रिकाम्या आहेत.
- तर इंदिरा बॅनर्जी या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील आठव्या महिला न्यायाधीश आहेत.
- तसेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांची जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या राज्यातील पहिल्या मुख्य महिला न्यायाधीश आहेत.
- तर सिंधू शर्मा या जम्मू काश्मीर उच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.
रुपे कार्ड, भीम अॅपने व्यवहार करा GST मध्ये सवलत मिळवा :
- रोकडरहित व्यवहाराला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने शनिवारी एक महत्वाची घोषणा केली आहे.
- रुपे कार्ड आणि भीम अॅप याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्यास ‘जीएसटी’मध्ये सवलत देण्याची योजना केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत करण्यात आली आहे.सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर लवकरच या योजनांचा अवलंब करण्यात येणार असून ग्रामीण आणि निमशहरी भागात रोकडरहित व्यवहारांना चालना मिळावी म्हणून हि ‘ऑफर’ देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
- या योजनेअंतर्गत भीम अॅप आणि रुपे कार्डद्वारे पेमेंट केल्यास GSTच्या 20 टक्के अथवा 100 रुपये यापैकी जे अधिक असेल, ती रक्कम कॅशबॅक म्हणून मिळणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार हजार कोटींची अंतरिम वेतनवाढ :
- राज्यातील 19 लाख शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल चार हजार कोटी रुपयांची अंतरिम वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- त्यानुसार किमान 25 हजार ते कमाल एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्मचाऱ्यांना गणपतीपूर्वी देण्यात येणार असून, महागाई भत्त्यापोटीची 14 महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.
- तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ, भत्ते व इतर सुविधा मिळत आहेत.
व्यावसायिक यानाच्या पहिल्या उड्डाणासाठी सुनीता विल्यम्सची निवड :
- व्यावसायिक अंतराळ यान व कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह नऊ जणांची निवड केली आहे.
- तर नव्या अंतराळ यानाची निर्मिती आणि संचलन बोइंग कंपनी आणि स्पेसएक्सने केले आहे.
- नासाचे आठ सक्रिय अंतराळवीर आणि एक माजी अंतराळवीर व व्यावसायिक चालक दलाचे सदस्य वर्ष 2019 च्या सुरुवातीला बोइंग सीएसटी-100 स्टारलाइट व स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सुलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर जातील.
दिनविशेष :
- 5 ऑगस्ट 1914 ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.
- नेल्सन मंडेला यांना 5 ऑगस्ट 1962 मध्ये तुरुंगात टाकण्यात आले.
- 5 ऑगस्ट 1962 मध्ये कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार तार्याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
- चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा 5 ऑगस्ट 1930 मध्ये जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा