29 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 September 2018 Current Affairs In Marathi

29 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2018)

भारत सातव्यांदा आशिया कप चॅम्पियन:

  • अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात केदार जाधवने बांगलादेशविरुद्ध विजयी धाव घेत भारताच्या सातव्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. Asia Cup 2018
  • अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात बांगलादेशने स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला अखेरपर्यंत झुंजवले. मात्र, भारतीयांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर जेतेपद निसटू दिले नाही.
  • तसेच गतविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारताना सर्वाधिक सातव्यांदा आशिया चषक पटकावला.
    बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 48.3 षटकात 222 धावा केल्यानंतर भारताने 50 षटकात 7 बाद 223 धावा करुन रोमांचक विजय मिळवला.

आयएनएसच्या अध्यक्षपदी जयंत मॅथ्यू यांची निवड:

  • इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) 2018-19 या वर्षासाठी मल्याळ मनोरमाचे जयंत मॅमेन मॅथ्यू यांची अध्यक्षपदी निवड झाली.
  • 28 सप्टेंबर रोजी आयएनएसची 79वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, त्यात मॅथ्यू यांची निवड झाली.
  • तसेच मिड-डेचे शैलेश गुप्ता हे डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून निवडले गेले. बिझनेस स्टँडर्डच्या श्रीमती अकिला उरणकर या यापूर्वी अध्यक्ष होत्या.
  • व्हार्ईस प्रेसिडेंटपदी एल. अदिमूलम (हेल्थ अँड द अँटिसेप्टिक) यांची, तर शरद सक्सेना (हिंदुस्थान टाइम्स, पाटणा) यांची मानद कोषाध्यक्षपदी 2018-19 वर्षासाठी निवड झाली. लव सक्सेना हे आयएनएसचे सरचिटणीस आहेत.

शबरीमला येथील मंदिर सर्व महिलांसाठी खुले:

  • शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात 10 ते 50 या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने 28 सप्टेंबर रोजी बहुमताने रद्दबातल ठरवली.
  • शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नमूद केले आहे. न्या. इंदू मल्होत्रा या एकमेव महिला न्यायाधीशांनी मात्र त्या प्रथेत हस्तक्षेप करण्याविरोधात मत दिले. Shabarimala
  • पन्नाशीपर्यंतच्या वयोगटातील महिला या जननक्षम असतात तसेच त्यांना मासिक पाळी येते, या कारणावरून ही बंदी लागू होती. सरन्यायाधीश मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने चार विरूद्ध एक अशा मताने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, महिलांना अय्यप्पा मंदिरात प्रवेश नाकारणे हा लैंगिक भेदभाव असून यात हिंदू महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. एफ नरीमन, न्या. अजय खालविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी एकसमान निकाल दिला.

वित्त संस्थांच्या व्याजदरात वाढ:

  • सूक्ष्म वित्त संस्थांकडून (एनबीएफसी-मायक्रो फायनान्स) दिली जाणारी छोटी कर्जे पाव टक्क्यांपर्यंत महागण्याची शक्यता आहे. या संस्थांनी कर्जदारांकडून वसूल करण्याच्या किमान व्याजदरात रिझर्व्ह बँकेने 0.10 टक्के वाढ केली आहे. हा दर आता वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
  • रिझर्व्ह बँकेने बिगर बँक वित्त संस्थांना (एनबीएफसी) कर्ज वितरणाचा परवाना दिला आहे. यापैकी सूक्ष्म वित्त संस्था (मायक्रो फायनान्स) बँकांकडून 8 ते 12 टक्के व्याजदराने कर्ज घेतात व 15 ते 21 टक्के व्याजदराने ग्राहकांना पत पुरवठा करतात.
  • तसेच ही कर्जे 5 हजार रुपयांपासून ते अधिकाधिक 50 हजार रुपयांची असतात. यांचा परतफेडीचा कालावधीसुद्धा कमी असतो. तात्काळ गरजेसाठी ही कर्जे दिली जात असल्याने त्यांचे वितरण ग्रामीण भागातच अधिक असते. आता ही कर्जे महागणार आहेत.
  • एनबीएफसी-मायक्रो फायनान्स संस्थांनी ग्राहकांना किमान व्याजदर किती आकारावा, हे रिझर्व्ह बँक दर तीन महिन्यांनी घोषित करते.

जागतिक क्रमवारीमध्ये पुणे विद्यापीठाचे स्थान उंचावले:

  • ऑक्‍सफर्ड ऑफ द ईस्ट‘ अशी ख्याती असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक स्तरावरील मूल्याकंनात पहिल्या पाचशे ते सहाशे विद्यापीठांच्या क्रमवारीत स्थान मिळवले आहे.
  • शैक्षणिक संस्थांचे जागतिक स्तरावर मूल्यांकन करणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशन या संस्थेने शैक्षणिक वर्ष 2018-19 ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात पुणे विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सहावा क्रमांक पटकाविला असून, पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
  • पुणे विद्यापीठ वगळता देशातील एकाही विद्यापीठाचा जागतिक स्तरावरील पहिल्या सहाशेपर्यंतच्या क्रमवारीत समावेश झालेला नाही. ‘टाइम्स’ संस्थेकडून दरवर्षी जगभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते.
  • विद्यापीठ 2016 पासून ‘टाइम्स’च्या जागतिक क्रमवारीत सहभागी होत आहे. गेली तीन वर्ष विद्यापीठ 600 ते 800 या क्रमवारीत होते. यंदा विद्यापीठाने महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

दिनविशेष:

  • 29 सप्टेंबर हा दिवस ‘जागातिक हृदय दिन‘ आहे.
  • सन 1917 मध्ये मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
  • बिर्ला तारांगण‘ हे आशियातील पहिले तारांगण सन 1963 मध्ये कोलकाता येथे सुरू झाले.
  • सन 2012 मध्ये ‘अल्तमस कबीर‘ हे भारताचे 39वे सरन्यायाधीश झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.