7 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
7 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 फेब्रुवरी 2020)
114 फायटर जेटचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी SAAB ‘ग्रिपेन’चे संपूर्ण पॅकेज द्यायला तयार :
- इंडियन एअर फोर्समधील अनेक स्क्वाड्रन निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे भारताला नव्या फायटर विमानांची आवश्यकता आहे.
- भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल फायटर विमाने विकत घेण्याचा करार केला असला तरी, त्याने गरज पूर्ण होणार नाही.
- मिग-21 विमानांच्या अनेक स्क्वाड्रन्स पुढच्या काही वर्षात निवृत्त होतील.
- तसेच चीन आणि पाकिस्तानचा एकाचवेळी सामना करण्यासाठी आपल्याला 42 स्क्वाड्रनची आवश्यकता आहे.
- तर एअर फोर्सचे आधुनिकीकरण आणि फायटर विमानांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारत सरकारकडून लवकरच 114 फायटर विमाने विकत घेण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. हा सर्व व्यवहार 15 अब्ज डॉलरच्या घरात आहे.
- हे कंत्राट मिळवण्यासाठी अमेरिकेची बोईंग, लॉकहीड मार्टिन, रशियाची मिग, फ्रान्सच्या राफेल आणि स्वीडनच्या साब कंपनीमध्ये स्पर्धा आहे.
- तसेच साबला हे कंत्राट हवे आहे. त्यासाठी साब ग्रिपेनच्या सिस्टिमसह संपूर्ण पॅकेज द्यायला तयार आहे. फक्त आम्ही टेक्नोलॉजी ट्रान्सफर करणार नाही. त्याऐवजी फायटर विमानांसाठी लागणारे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात भारताला मदत करु असे ओला रिगनेल यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
काँग्रेसचे माजी खासदार राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले विश्वस्त :
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली.
- तर ट्रस्टच्या विश्वस्तांची निवडही सरकारकडून करण्यात आली असून, काँग्रेसकडून दोन वेळा खासदार राहिलेले के. परासरन हे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे पहिले विश्वस्त आहेत.
- तसेच परासरन यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात केंद्रात महाधिवक्ता म्हणूनही काम केलं आहे.
- राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली. ट्रस्टवर 15 विश्वस्त नेमले जाणार आहेत.
- तर त्यातील दहा जणांची निवड केंद्र सरकारनं केली आहे. त्यात पहिलं नाव काँग्रेसचे माजी खासदार के. परासरन याचं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं याची अधिसूचना जारी केली आहे.
- राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचं कार्यालयं नवी दिल्लीतील ग्रेटर कैलास पार्ट आर-20 येथे असणार आहे. जे परासरन यांचं निवासस्थान आहे. तिथूनच याचं काम चालणार आहे. सरकारकडून नियुक्त करण्यात आलेले विश्वस्त राम मंदिराच्या बांधकामारवर नजर ठेवणार आहेत.
- के.परासरन यांच्याबरोबरच दहा विश्वस्तांची नावे जाहीर करण्यात आली आहे. जगदगुरु शंकराचार्य, ज्योतिषपीठाधीश्वर स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज (अलहाबाद), पेजावर मठाचे जगदगुरू माधवाचार्य स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ महाराज, युगपुरूष परमानंद महाराज, पुण्यातील स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांच्यासह दहा जणांची निवड केली आहे. उर्वरित पाच जणांची निवड हे दहा विश्वस्त करणार आहे.
विराट कोहली ब्रँड व्हॅल्यू मध्ये सलग तिसऱ्या वर्षी अव्वल :
- भारताच्या सर्वांत मोठ्या सेलिब्रिटी ब्रँडचा मान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पटकावला आहे.
- तर यामध्ये त्याने बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान, सलमान खान यांनाही मागे टाकले आहे.
- अमेरिकेच्या ग्लोबल अॅडव्हाझरी फर्म डफ अॅण्ड फेल्प्सच्या रिपोर्टनुसार रनमशीन विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 237.5 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 1 हजार 691 कोटी रुपये इतकी आहे.
- तर विविध उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या मानधनातील वाढ, क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरी आणि एकंदरीत प्रसिद्धीमध्ये झालेली वाढ या गोष्टींचा विचार करून विराटची ब्रँड व्हॅल्यू ठरवण्यात आली आहे.
- रोहित आणि सचिन तेंडूलकरपेक्षा विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू दहापटीने जास्त आहे. उप कर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू 164 कोटी रूपये तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू 179 कोटी रूपये आहे.
- रनमशीन विराट कोहलीने ब्रँड व्हॅल्यूमध्ये बॉलिवूड स्टार शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणबीर सिंह, यासारख्या आघाडीच्या कलाकारांना मागे टाकले आहे. बँड व्हॅल्यूच्या बाबतीत विराट कोहली सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानावर आहे.
रिझर्व्ह बँकेचे आर्थिक पतधोरण जाहीर :
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी दुपारी आर्थिक पतधोरण जाहीर करताना व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही.
- आरबीआयने रेपो तसेच रिव्हर्स रेपो दर कायम ठेवले आहे. त्यामुळे कर्जदारांना किंवा नवीन कर्ज घेण्याच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांना स्वस्त कर्जासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.
- तसेच, रेपो दर जैशे थेच ठेवल्यामुळे शेअर बाजारात निराशाचे वातावरण असल्याची शक्यता आहे.
- आरबीआयने गुरुवारी रेपो दर 5.15 टक्के तर, रिव्हर्स रेपो दर 4.90% टक्के कायम ठेवला. तर सीआरआर 4 टक्के आणि एसएलआर 18.5 टक्के इतका ठेवला आहे.
- याशिवाय, आरबीआयने आर्थिक वर्षात (2020-21) विकास दर 6 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेने डिसेंबरमधील पतधोरणाआधी सलग पाचवेळा बँकेने रेपो दरात कपात केली होती. मात्र, बँकांनी व्याजदर कपातीला फारसा प्रतिसाद दिला नाही.
भारताच्या सायकलपटूंची ऐतिहासिक कामगिरी :
- भारताच्या सायकलपटूंनी गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली.
- तर या शानदार कामगिरीमुळे आता जगातील अव्वल 18 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा समावेश होईल.
- तसेच एसो एलबेन, जेम्स सिंग, रोजित सिंग आणि रोनाल्डो सिंग या युवा सायकलपटूंचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने गुरुवारी युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) ट्रॅक सायकलिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली.
- ही स्पर्धा जर्मनीची राजधानी बर्लिन येथे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये रंगेल. दरम्यान, जागतिक स्पर्धेत भारतीय पुरुष जरी पहिल्यांदाच सहभागी होणार असले, तरी याआधीच या स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकलेला आहे.
- याआधी 2016 साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताची महिला सायकलपटू देबोराह हेरॉल्ड हिने महिलांच्या 500 मीटर अंतराच्या चाचणी स्पर्धेतून पात्रता मिळवली होती. यानंतर भारताचा या स्पर्धेत दुसºयांदा, तर सांघिक गटात पहिल्यांदाच समावेश होईल.
दिनविशेष:
- आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अँन्ड्रयूज यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1873 रोजी झाला होता.
- बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट सन 1920 मध्ये पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
- सन 1974 मध्ये ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
- क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना सन 2003 या वर्षी श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा