Current Affairs (चालू घडामोडी)

Current Affairs of 3 July 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 जुलै 2018)

पत्रकार रजत शर्मा ‘डीडीसीए’चे नवे अध्यक्ष :

  • वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे नवे अध्यक्ष असतील. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताचे माजी वेगवान गोलंदाज मदनलाल यांचा 517 मतांनी पराभव केला.
  • रजत शर्मा यांच्या पॅनेलचे निवडणुकीत वर्चस्व राहिले. त्यांनी सर्वच्या सर्व 12 जागा जिंकल्या. रजत शर्मा यांनी 1521 मते पडली. मदनलाल यांना 1004 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील तिसरे उमेदवार विकास सिंग यांना 232 मते मिळाली.
  • ‘बीसीसीआय’चे हंगामी अध्यक्ष सी.के. खन्ना यांच्या अस्तित्वाला या निवडणुकीत धक्का बसला आहे. त्यांची पत्नी शशी या निवडणुकीत उपाध्यक्षपदाची निवडणूक हरल्या आहेत. त्यांना राकेश बन्सल यांनी हरवले.
  • रजत शर्मा यांच्या पॅनेलला अनपेक्षित यश मिळाले असले, तरी यामुळे त्यांना मोकळेपणाने संघटनेचे कामकाज चालवता येईल, अशी चर्चा दिल्ली क्रिकेट वर्तुळात सुरू होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 जुलै 2018)

नीरव मोदीवर रेड कॉर्नर नोटीस जारी :

  • पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अब्ज डॉलर्सच्या (13000 कोटी रुपये) घोटाळय़ातील आरोपी असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी व कर्मचारी सुभाष परब यांच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
  • केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या विनंतीनुसार ही नोटीस 29 जून रोजी जारी करण्यात आली असून, ती इंटरपोलने सोमवारी सार्वजनिक पातळीवर प्रसिद्ध केली आहे. या नोटिशीमुळे नीरव मोदी वेगवेगळय़ा देशात खुलेआम फिरू शकणार नाही. त्याला अटक होऊ शकते.
  • मुंबईतील सीबीआय न्यायालयात नीरव मोदी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्याच्या विरोधात अटक वॉरंट न्यायाधीश जे.सी. जगदाळे यांनी जारी केले आहे.
  • तसेच सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. नोटिशीत 192 सदस्य देशांना नीरव मोदी कुठे आढळून आल्यास त्याला अटक करून संबंधित देशाच्या (भारत) ताब्यात देण्यात यावे, असे आवाहन केले आहे.

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटशी जुडणार :

  • ‘आतापर्यंत शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमाचा चांगला वापर होत असल्याचे दिसून आले आहे. शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमाचा वापर वाढण्यासाठी राज्यातील सर्व शाळांना इंटरनेट आणि वायफायने जोडले जाणार आहे,’ असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
  • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषदेच्या ‘दीक्षा‘ या अ‍ॅपवरील ‘महाराष्ट्र इन-सव्‍‌र्हिस टीचर्स र्सिोस अ‍ॅप‘ (मित्र 2.0) हे मोबाइल अ‍ॅप तावडे यांच्या हस्ते सादर करण्यात आले.
  • शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व बालभारतीचे संचालक सुनील मगर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे आदी या वेळी उपस्थित होते.
  • मित्र अ‍ॅपमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दृकश्राव्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध आहे.

भारताचे माजी नौदलप्रमुख जयंत नाडकर्णी कालवश :

  • भारताचे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे 2 जुलै रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
    जयंत नाडकर्णी भारताचे 14वे नौदल प्रमुख होते.
  • डिसेंबर 1987 ते नोव्हेंबर 1990 पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून धुरा संभाळली. कुलाब्यातील नौदलाच्या आयएनएचएस अश्वनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • जयंत नाडकर्णी यांना दोन मुले असून त्यांचा एक मुलगा भारतीय नौदलात रियर अॅडमिरल पदावर कार्यरत आहे. नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे 2016 मध्ये निधन झाले.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै :

  • प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे या मुदतीपर्यंत विवरणपत्र न भरल्यास किमान एक हजार ते कमाल दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
  • केंद्र सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता 31 जुलैपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक केले आहे. हा नियम सर्व करदात्यांना लागू असून यामध्ये लेखापरीक्षण आवश्‍यक असणारे करदाते वगळण्यात आले आहेत.
  • तसेच त्यांच्यासाठी विवरणपत्र दाखल करण्याची 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. पाच लाख रुपयांच्या आतील वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनी विवरणपत्र 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत दाखल केल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
  • पाच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तर 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 पर्यंत विवरणपत्र दाखल केल्यास 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना एक हजार रुपये तर पाच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. प्राप्तिकर कायद्यातील कलम 234फ नुसार दंडाच्या रकमेवर व्याजदेखील आकारले जाईल.

दिनविशेष :

  • सन 1850 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
  • महात्मा फुले यांनी 3 जुलै 1852 मध्ये दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
  • भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ सन 1855 मध्ये झाला.
  • 3 जुलै 1884 मध्ये डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
  • सन 2006 मध्ये एक्स.पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जुलै 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago