2 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 मार्च 2019)
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले:
- शक्य तितकी दिरंगाई करीत पाकिस्तानने भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी रात्री सुटका केली. पंजाबातील वाघा सीमेवर त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
- 1 मार्च रोजी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी अभिनंदन यांनी मायभुमीत प्रवेश केला. अभिनंदन यांच्या सुटकेला जवळपास तीन तास उशीर झाला. भारतात पोहोचताच अभिनंदन यांना तातडीने त्यांना मोटारींच्या ताफ्यातून अज्ञात स्थळी नेण्यात आले.
- पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना सीमारेषा पार करण्यासाआधी व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावल्यानेच दिरंगाई झाली. हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर पाकिस्तानी सरकारने लगेचच रात्री 9 वाजता मीडियासाठी तो रिलीजही केला. या व्हिडीओत अभिनंद आपण टार्गेट शोधण्यासाठी नियंत्रण रेषा पार केली होती, मात्र आपलं लढाऊ विमान कोसळलं असं सांगत आहेत.
- ‘पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी मला गर्दीपासून वाचवलं. पाकिस्तानी लष्कर अत्यंत शिस्तबद्ध असून आपण खूपच प्रभावित झालो आहोत’, असं अभिनंदन यांनी व्हिडीओत म्हटलं आहे. हा व्हिडीओ एडीट करण्यात आला आहे असं दिसत आहे. कारण यामध्ये 15 कट आहेत.
- भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या एका पाकिस्तानी विमानाचा वेध घेत असताना त्यांचे मिग विमान अपघातग्रस्त होऊन 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. त्यावेळी पॅराशूटद्वारे उतरत असलेल्या अभिनंदनला पाकिस्तानने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या दोन चित्रफितीही पाकिस्तानने जारी केल्या होत्या. त्यात त्यांना मारहाण झाल्याच्या खुणाही जाणवत होत्या.
- भारताने या चित्रफितींना जोरदार आक्षेप घेत, जीनिव्हा करारानुसार अभिनंदन यांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणी केली होती. अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीननेही पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची घोषणा केली होती.
OIC मध्येही भारताचा विजय:
- इस्लामिक देशांच्या ओआयसी परिषदेनेही पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. ओआयसी परिषदेने यंदाच्या 46व्या अधिवेशनासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना निमंत्रण दिले.
- तर त्यावरुन पाकिस्तान नाराज होता. यंदाच्या ओआयसी परिषदेचे आयोजन करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) भारताला दिलेले निमंत्रण रद्द करावे अन्यथा आपण या परिषदेवर बहिष्कार घालू अशी भूमिका पाकिस्तानने घेतली होती.
- पण यूएई आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्यांनी भारताचे निमंत्रण रद्द केले नाही. त्यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अखेर आपण या परिषदेला उपस्थित राहणार नाही असे जाहीर केले. हा सुद्धा पाकिस्तानचा एक पराभवच आहे. ओआयसी ही इस्लामिक देशांमध्ये सहकार्यासाठी स्थापन झालेली संघटना आहे.
- ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेला मी उपस्थित राहणार नाही. पण ओआयसीमध्ये आमचे 19 प्रलंबित ठराव आहेत. काश्मीरमधल्या क्रूर वागणुकीसंदर्भात काही ठराव आहेत. या ठरावांच्या मंजुरीसाठी आमचे कनिष्ठ अधिकारी परिषदेला उपस्थित राहतील. या परिषदेत भारताला निरीक्षकाचा दर्जा देण्याचा प्रयत्न झाल्यास पाकिस्तान त्याला कडाडून विरोध करेल असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले.
- दरम्यान इस्लामिक देशांच्या (ओआयसी) बैठकीत सहभागी झालेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अपेक्षेप्रमाणे दहशतवादावर भाष्य केले आहे.
बीसीसीआयतर्फे नवीन जर्सीचे अनावरण:
- पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना 1 मार्च रोजी पाकिस्तानी सैन्याने भारताकडे सोपवलं. वाघा बॉर्डरच्या मार्गाने अभिनंदन वर्थमान सर्व सोपस्कार पार पाडून भारतात दाखल झाले, आणि त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या प्रत्येक भारतीयांनी एकच जल्लोष केला.
- भारतात दाखल झाल्यानंतर त्यांना विशेष विमानाने दिल्लीला नेण्यात आलं. अभिनंदन यांच्या घरवापसीनंतर सोशल मीडियावर त्यांच्या स्वागताचे अनेक मेसेज पडत आहेत. बीसीसीआयने अभिनंदन यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करत सर्वांचं मन जिंकलं आहे.
- आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने आज नवीन जर्सीचं अनावरण केलं. या जर्सीचा पहिला क्रमांक अभिनंदन यांना देत बीसीसीआयने त्यांचं स्वागत केलं आहे. तुम्ही आमच्या हृदयात आहात, आणि तुम्ही दाखवलेल्या धैर्यामुळे भविष्यकाळातील पिढीला प्रेरणा मिळो अशा आशयाचा संदेश बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.
‘सीएस’ अभ्यासक्रमासाठी आता प्रवेश परीक्षा:
- इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) कंपनी सचिव (सीएस) अभ्यासक्रमासाठी आता प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्तेत वाढ करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा कल जोखण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे.
- केंद्रीय वाणिज्य व्यवहार मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर ‘सीएस’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेची अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे ‘आयसीएसआय’चे अध्यक्ष रणजित पांडे यांनी सांगितले.
- ललित कला अभ्यासक्रमाशिवाय कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी सीएस अभ्यासक्रम करू शकतात.
- विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रवेश परीक्षा सुरू करण्यात येत आहे. या बाबत दोन महिन्यांपूर्वी सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रवेश परीक्षेबाबतच्या या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळाल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल, असे पांडे यांनी सांगितले.
- कंपनी सचिव अभ्यासक्रमांतर्गत सध्या फाउंडेशन परीक्षा, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्राम कोर्स चालविला जातो. त्यात एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे, प्रोफेशनल प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे, तर प्रोफेशनल प्रोग्राम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागते.
दिनविशेष:
- सन 1857 मध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
- जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सन 1903 मध्ये सुरु झाले.
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सन 1952 या वर्षी सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले होते.
- सन 1969 मध्ये जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा