23 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली
23 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 ऑक्टोबर 2020)
केंद्र सरकार खर्च करणार 50 हजार कोटी रुपये:
भारताने आता करोनाच्या लस उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने सुमारे 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
प्रत्येक नागरिकासाठी या लशीचा खर्च 6 ते 7 डॉलर म्हणजेच 500 रुपयांपेक्षा जास्त असणार आहे.
त्यामुळे सरकारने 130 कोटी जनतेसाठी 7 बिलियन डॉलर म्हणजेच 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसीचे संचालक रामानन लक्ष्मीनारायण यांचं म्हणण आहे की, “भारत करोनाच्या लशीचा मोठा खरेदीदार असून विक्रेताही आहे. त्यामुळे लस निर्मितीची किंमत कमीही होऊ शकते.”
भारत सरकारला देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्यासाठी सुमारे 80,000 कोटी रुपयांची गरज लागेल.
‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली:
‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. भारतीय लष्करामध्ये या क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाईल.
हेलिकॉप्टरमधून डागल्या जाणाऱ्या रणगाडाविरोधी मिसाइलची चाचणी केल्यानंतर आज नाग क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
19 ऑक्टोबरला बालासोर टेस्ट रेंजवर स्टँड ऑफ अँटी टँक मिसाइलची चाचणी करण्यात आली होती.
या क्षेपणास्त्राद्वारे 10 किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो.
जेईई मुख्य परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार:
पुढील वर्षी होणारी जेईई मुख्य परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहितीकेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.
संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) हा निर्णय घेतला आहे.
अभियांत्रिकीसाठीची जेईई मुख्य परीक्षा (प्रवेश परीक्षा) सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच घेतली जाते.
ज्या राज्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जाते तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल.”
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : बायर्न म्युनिकची धडाक्यात सुरुवात:
बायर्न म्युनिकने गतविजेतेपद आपल्याकडेच राखण्याच्या दिशेने धडाक्यात सुरुवात केली.
बुधवारी मध्यरात्री रंगलेल्या चॅम्पियन्स लीगच्या सलामीच्या सामन्यात त्यांनी अॅटलेटिको माद्रिदचा ४-० असा धुव्वा उडवला.
मंगळवारी बायर्न म्युनिकचा पहिला फुटबॉलपटू करोनाग्रस्त आढळून आल्यानंतर या सामन्याविषयी अनिश्चितता होती.
पण बायर्नने या स्पर्धेतील सलग 12वा विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली.
किंग्सले कोमानने 28व्या व 72व्या मिनिटाला गोल करत विजयात महत्त्वाचा हातभार लावला.
दिनविशेष:
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म23 ऑक्टोबर 1778 मध्ये झाला.
सन 1890 मध्ये हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म23 ऑक्टोबर 1923 मध्ये झाला.
सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना सन 1997 मध्ये प्रदान झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.