भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नागपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये आठ षटकांमध्ये 91 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात एका विश्वविक्रमाला गवसणी घातली.
हेजलवूडच्या पहिल्याच षटकात दोन खणखणीत षटकार खेचक रोहित शर्माने सर्वाधिक षटकार लगावण्याचा अनोखा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला.
रोहित आता टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावाणारा खेळाडू ठरला आहे.
हिटमॅन नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय कर्णधारने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या तीन षटकांमध्ये चार षटकार लगावले.
यामुळे त्याने मारलेल्या षटकारांची संख्या 176 इतकी झाली. ही मालिका सुरु होण्यापूर्वी रोहितच्या नावावर 171 षटकार आणि 323 चौकार होते.
पहिल्या टी-20 सामन्यात रोहितने एक षटकार मारुन न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टीलच्या 172 षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
दुसऱ्या सामन्यात पहिल्या दोन षटकांमध्ये तीन षटकार लगावत रोहितने सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ची नवी कार्यकारिणी जाहीर :
देशभरातील वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांच्या प्रकाशकांची शिखर संस्था असलेल्या ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
तेलुगू माध्यमसमूह ‘साक्षी’चे के राजा प्रसाद रेड्डी यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
मोहित जैन (इकोनॉमिक टाईम्स) यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
संस्थेच्या 83वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 2022-23 या वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली.
‘आज समाज’चे राकेश शर्मा यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
‘अमर उजाला’चे तन्मय महेश्वरी हे मानद खजिनदार तर मेरी पॉल या संस्थेच्या महासचिव असतील.
दिनविशेष:
भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 मध्ये झाला.
महात्मा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सन 1932 मध्ये पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
24 सप्टेंबर 1948 रोजी होंडा मोटार कंपनीची स्थापना झाली.
सन 1960 मध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या यू.एस.एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली 2007 या वर्षी भारताने टी-20 विश्वकप जिंकला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.