गुलाम नबी आझाद यांच्याकडून ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ची घोषणा :
काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा सोमवारी केली.
‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल.
हा पक्ष लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक असेल.
महात्मा गांधीजींच्या आदर्शाचे अनुकरण करणारी या पक्षाची विचारधारा असेल.
विराट कोहली अव्वलस्थानी :
भारतीय संघाचा आधारस्तंभ आणि प्रमुख फलंदाज विराट कोहलीने कालच्या सामन्यातील खेळीने ऑस्ट्रेलियन एका दिग्गज फलंदाजाला मागे टाकले आहे.
विराट आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका देशाविरुद्ध सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.
त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने ही कामगिरी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी20 सामने खेळताना केली आहे.
त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 सामने खेळताना एकूण 8 वेळा 50 किंवा त्यापेक्षा मोठी खेळी केली आहे. हा एक विश्वविक्रम ठरला आहे.
बीसीसीआयला लवकरच मिळणार नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.
निवडणुकीसोबतच वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन करण्यात येणार आहे.
बीसीसीआय 18 ऑक्टोबरला निवडणूक घेणार आहे. हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व पदांसाठी असेल.
सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. तर जय शहा हे सचिवपदावर आहेत. या दोघांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे.
टीम इंडियाने मोडला ‘हा’ विक्रम :
पहिला सामना पराभवच पत्करावा लागल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींची निराशा झाली होती मात्र त्यापाठोपाठ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही सामन्यात विजय प्राप्त करून भारताने मालिका जिंकली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची चमकदार कामगिरी त्यांना या वर्षातील सर्वात महत्त्वाचा विजय मिळवून गेली.
एकीकडे ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच आता रोहित ब्रिगेडने पाकिस्तानलाही मोठा दणका दिला आहे.
टी 20 खेळप्रकारात टीम इंडिया आता जगात भारी संघ ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध या विजयासह भारताने एका वर्षात T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम मोडला आहे.
रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या T20I मधील विजय हा भारताचा 2022 मधील T20I मधील 21 वा विजय होता.
आतापर्यंत हा विजय पाकिस्तानच्या नावे होता. पाकिस्तानने 2021 सालात तब्बल 20 टी-20 सामने जिंकले होते.
आता 21 वा विजय मिळवत भारत यंदाच्या सर्वाधिक टी 20 सामने जिंकणार संघ बनला आहे.
दिनविशेष:
27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन आहे.
सन 1825 मध्ये द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
27 सप्टेंबर 1925 रोजी डॉ. केशव हेडगेवार व्दारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना करण्यात आली.
भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1953 मध्ये झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.