आयपीएलमधील महत्त्वाच्या समित्यांवर राहुल द्रविडची नियुक्ती :
राहुल द्रविडवरचा विश्वास बीसीसीआयने पुन्हा व्यक्त करत त्याच्यावर आयपीएलमधील प्रमुख समित्यांची जबाबदारी सोपवली आहे.
आता त्यांचा आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. वि
आयपीएलच्या तीन समित्यांपैकी दोन समित्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथे झालेल्या बीसीसीआयच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्रविड यांचा लीगच्या आचारसंहिता समिती आणि तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला.
इटलीत नव-फॅसिस्ट विचाराचे सरकार :
इटलीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नव-फॅसिस्ट विचारधारेच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाने सर्वाधिक मते मिळवली आहेत.
त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर देशातील पहिले अतिउजव्या विचारसणीचे सरकार स्थापन होणार असून ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनतील, असे सोमवारी स्पष्ट झाले.
इटली हा युरोपीय महासंघाचा संस्थापक सदस्य देश आहे.
शिवाय, युरोपातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था अशीही त्याची ओळख आहे.
विराट कोहलीने एकाच सामन्यात मोडले तीन विक्रम:
भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा आपल्या मूळ शैलीत दिसला.
मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात त्याने वेगवान धावा केल्या आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.
विराटने आपल्या टी20 कारकिर्दीतील 33वे अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
या सामन्यांमध्ये कोहलीने 48 चेंडूत 63 धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवबरोबर तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली.
या दरम्यान त्याने आपल्या मॅच-विनिंग इनिंगमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
विराटच्या आता 471 सामन्यांच्या 525 डावांमध्ये ५३.६२ च्या सरासरीने 24,078 धावा आहेत.
यादरम्यान त्याने 71 शतके आणि 125 अर्धशतके झळकावली. याशिवाय विराटने आणखी एक कामगिरी केली.
त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 16 हजार धावा पूर्ण केल्या आणि सचिननंतर असे करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला.
विराटने टी20 आंतरराष्ट्रीयमध्येही एक विक्रम केला आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3600 धावा पूर्ण केल्या आणि यानंतर हा आकडा गाठणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
दिनविशेष:
28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन, आंतरराष्ट्रीय जाणून घेण्याचा हक्क दिन तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून पाळला जातो.
क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता.
जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.
28 सप्टेंबर 1967 हा दिवस सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा स्मृतीदिन आहे.
ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1982 मध्ये झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.