29 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

लेफ्ट. जन. अनिल चौहान

29 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2022)

लेफ्ट. जन. अनिल चौहान संरक्षण दलप्रमुख :

  • निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • लेफ्ट. जन. चौहान हे देशाचे दुसरे सीडीएस असतील. यासोबतच केंद्राच्या संरक्षणविषय विभागाचे ते सचिवही असतील.
  • जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिने सीडीएस हे पद रिक्त होते.
  • बुधवारी केंद्र सरकारने लष्करात तब्बल 40 वर्षांचा अनुभव असलेल्या लेफ्ट. जन. चौहान यांची नियुक्ती जाहीर केली.
  • काश्मीर खोरे आणि इशान्येकडील राज्यांमधील फुटिरतावाद्यांविरोधात अनेक मोहिमांचे चौहान यांनी नेतृत्व केले आहे.
  • लष्कराच्या पूर्व आघाडीचे मुख्याधिकारी म्हणून ते मे 2021मध्ये निवृत्त झाले.

आर वेंकटरामनी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल :

  • ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • विद्यमान अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
  • 1 ऑक्टोबर 2022 पासून ते आपला पदभार स्वीकारतील, असे या ट्वीटमध्ये रिजिजू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
  • विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल हे 91 वर्षांचे असून त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ :

  • दसरा-दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.
  • 1 जुलै 2022 पासून, पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही भत्तावाढ लागू होईल.
  • 41.85 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69.76 लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभ होईल.

‘पीएफआय’वर बंदी :

  • ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने बुधवारी पाच वर्षांची बंदी घातली.
  • आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ‘पीएफआय’वरील बंदीबाबत निवेदन प्रसृत केले.
  • त्यात ‘पीएफआय’सह तिच्याशी संबंधित 8 संघटनांवरही बंदी घालण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

रेशन कार्ड धारकांना ‘या’ महिन्यापर्यंत मिळणार मोफत धान्य :

  • पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत तीन महिने वाढवण्यात आली आहे.
  • त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळणार आहे.
  • त्यामुळे 80 करोड नागरिकांना याचा लाभ घेता येईल.
  • ग्रामीण भागाला 75 टक्के तर शहरी भागाला 50 टक्के मोफत धान्य दिलं जाणार आहे.

अयोध्येतील चौकाला लता मंगेशकर यांचं नाव:

  • गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आज अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे.
  • त्याशिवाय या चौकात एक 40 फूट आणि 14 टन वजनाच्या वीणेची मूर्ती ठेवण्यात आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं.
  • यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

चित्त्यांच्या सरंक्षणासाठी ‘स्निफर डॉग’ करणार तैनात :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामीबीया देशातून 8 चित्ते भारतात आणण्यात आली आहे.
  • या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं आहे.
  • या चित्त्याचं संरक्षण करण्यासाठी आता श्वान पथक तैनात करण्यात येणार आहे.
  • यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) च्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात ‘जर्मन शेफर्डस’ जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे.
  • हे केंद्र हरियाणातील पंचकुला येथे आहे.
  • या कुत्र्यांना वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडिया आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.

भारताची दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून मात :

  • पुनरागमनवीर अर्शदीप सिंग, दीपक चहर आणि हर्षल पटेल या वेगवान त्रिकुटाच्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी व 20 चेंडू राखून मात केली.
  • अखेर त्यांनी चाचपडत 20 षटकांत 8 बाद 106 धावांपर्यंत मजल मारली.
  • भारताने हे लक्ष्य 16.4 षटकांत गाठत विजयी सलामी दिली.

दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची आयसीसी क्रमवारीत झेप :

  • इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 143 धावांची खेळी करणारी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत चार गुणांची झेप घेत पाचवे स्थान मिळवले आहे.
  • हरमनप्रीतच्या भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 3-0 असा व्हाईटवॉश देणाचा पराक्रम प्रथमच केला.
  • या खेळीसह हरमनप्रीतने अनेक विक्रम मोडले आणि आता आयसीसी नेही तिच्या या खेळीची दखल घेत आज जाहीर केलेल्या महिलांच्या एकदिवसीय खेळाडू क्रमवारीत हरमनप्रीतचे प्रगती झाली आहे.
  • सलामीवीर स्मृती मंधाना व दीप्ती शर्मा यांनीही ताज्या क्रमावारीत आगेकूच केली आहे.
  • मंधानाने इंग्लंड दौऱ्यावर दोन सामन्यात अनुक्रमे 40 व 50 धावा केल्या त्याच्या जोरावर ती एक स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
  • टी20 च्या मध्ये फलंदाजांमध्ये मंधाना दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दिनविशेष :

  • 29 सप्टेंबर हा दिवस ‘जागातिक हृदय दिन‘ आहे.
  • सन 1917 मध्ये मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
  • ‘बिर्ला तारांगण‘ हे आशियातील पहिले तारांगण सन 1963 मध्ये कोलकाता येथे सुरू झाले.
  • सन 2012 मध्ये ‘अल्तमस कबीर‘ हे भारताचे 39वे सरन्यायाधीश झाले.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago