31 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 मार्च 2022)
‘बिमस्टेक’चे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी भारताकडून एक दशलक्ष डॉलर :
बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (बिमस्टेक) गटाच्या पाचव्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गटाचे आर्थिक सामथ्र्य वाढवण्यासाठी एक दशलक्ष डॉलर देण्याचा संकल्प जाहीर केला.
तर या गटातील देशांनी मुक्त व्यापार करार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
भारतासह बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या गटाचे सदस्य देश आहेत.
तसेच श्रीलंका सध्या या ग्रुपचे अध्यक्षपद भूषवत आहे.
केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात बुधवारी तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली़.
तर यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्के झाला असून, तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने जुलै 2021 पासून भत्तावाढ लागू होणार असून, चालू मार्च महिन्याच्या वेतनात थकबाकीसह ही वाढ देण्यात येईल.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला़.
केंद्राच्या या निर्णयाचा सुमारे 47.68 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 6862 लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ होणार असून, सरकारी तिजोरीवर 9 हजार 544.50 कोटींचा भार पडणार आहे.
पाकिस्तानच्या बाबर आझमने रचला ‘हा’नवा विक्रम :
भारतात एकीकडे आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा थरार रंगला असून तिकडे पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे.
तर या मालिकेदरम्यान पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने मोठी कामगिरी करुन दाखवली आहे.
त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 4000 धावा केल्या असून भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.
पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात चार हजार धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.
तसेच आझमने एकूण 82 डावांमध्ये हा विक्रम रचला आहे.
तर याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हसीम आमलाने 81 डावांमध्ये 4000 धावा केलेल्या असून तो या विक्रमामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
बाबर आझमने 4000 धावा करण्याच्या विक्रमामध्ये विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे.
सर्वात जलद गतीने आणि कमी डावात 4000 धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली हा आशियातील पहिला खेळाडू होता.
तर त्याने 93 डावांत हा विक्रम आपल्या नावावर केलेला होता.
मनिका-अर्चनाला कांस्य :
दोहा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत बुधवारी मनिका बत्रा आणि अर्चना कामत जोडीला महिला दुहेरीच्या कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
उपांत्य सामन्यात लि यू-झून आणि चेंग आय-चिंग जोडीकडून त्यांनी 8-11, 6-11, 7-11 असा पराभव पत्करला.
जी. साथियान आणि मनिका यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने गमावले.
साथियानने स्वीडनच्या क्रिस्टियन कार्लसनकडून हार पत्करली, तर जर्मनीच्या यिंग हॅनने मनिकाला नमवले.
माजी क्रिकेटपटू राहुल मंकड यांचे निधन :
मुंबईचे माजी फलंदाज राहुल मंकड यांचे बुधवारी बुधवारी निधन झाले.
सलामीवीर राहुल यांनी 1972-73ते 1984-85 या कालावधीतील 47 सामन्यांत 35.77 च्या सरासरीने एकूण 2111 धावा केल्या.
तर यात पाच शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश होता.
रणजी विजेत्या मुंबईच्या संघात ते चार वेळा सदस्य होते.
याशिवाय 1978-79च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यातही त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.
दिनविशेष :
सन 1504 मध्ये 31 मार्च रोजी शिखांचे दुसरे गुरू ‘गुरू अंगद देव’ यांचा जन्म झाला.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म सन 1865 मध्ये 31 मार्च रोजी झाला.
डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
31 मार्च 1889आरोजी आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला 2 वर्षे, 2 महिने व 2 दिवस लागले.
भारतीय विद्वान ग्यानी ‘चेत सिंग’ यांचा जन्म सन 1902 मध्ये 31 मार्च रोजी झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.