Current Affairs (चालू घडामोडी)

4 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

ऑनलाइन गेम Rummy आणि Poker वर बंदी- आंध्रप्रदेश सरकार

4 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2020)

ऑनलाइन गेम Rummy आणि Poker वर बंदी- आंध्रप्रदेश सरकार:

  • आंध्रप्रदेश सरकारने ऑनलाइन गेम्स रमी आणि पोकरवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या गेम्सच्या माध्यमातून तरुण चुकीच्या मार्गावर भरकटत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
  • मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.
  • या बैठकीत ऑनलाइन जुगारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला असं माहितीमंत्री वैकटरमय्या यांनी दिली आहे.
  • बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “ऑनलाइन जुगाराने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.
  • दिशाभूल करुन तरुणांचं नुकसान केलं जात होतं. यामुळेच आम्ही तरुणांचं रक्षण करण्याच्या हेतूने अशा पद्धतीच्या सर्व ऑनलाइन गेम्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला”.

डब्ल्यूएचओ ला 60 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक थकबाकी देण्यात येणार नाही- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प:

  • जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) 60 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक थकबाकी देण्यात येणार नाही.
  • ती रक्कम संयुक्त राष्टांच्या अन्य कार्यक्रमांसाठी दिली जाईल, असा निर्णय अमेरिके चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
  • कोविड-19 ची लस विकसित आणि वितरित करण्याच्या डब्ल्यूएचओ संचालित प्रकल्पात अमेरिका सहभागी होणार नसल्याचे बुधवारी व्हाइट हाऊसने जाहीर केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने वरील निर्णय घोषित केला आहे.
  • या पार्श्वभूमीवर साधारणपणे 62 दशलक्ष डॉलरची थकबाकी रोखण्याचा निर्णय हा ट्रम्प प्रशासनाचा संघटनेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा एक भाग आहे.

राष्ट्रीय कबड्डीपटू अमर पवार यांचे निधन:

  • भारतीय रेल्वे संघाकडून सलग 11 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्रातील अमर पवार (71 वर्षे) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
  • अमर यांचे वडील राजाराम पवार यांनी पाच वेळा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे नेतृत्व केले होते.
  • काका शिवराम पवार भारतीय व मध्य रेल्वेचे चतुरस्र खेळाडू. तसेच दोन भाऊ, मुलगा, मुली व सूनदेखील कबड्डी पटू आहेत.

दिनविशेष :

  • महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1221 मध्ये झाला.
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.
  • थॉमस एडिसन यांनी 4 सप्टेंबर 1882 मध्ये इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले. तसेच वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
  • केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म 4 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.
  • सन 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
  • रघुराम राजन यांनी सन 2013 मध्ये रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला होता.
Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago