8 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2022)
‘बुकर’ पुरस्कारासाठी लघुयादी जाहीर :
कथात्म साहित्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बुकर पुरस्कारांसाठी यंदाची नामांकनांची लघुयादी जाहीर झाली असून यंदा पाच राष्ट्रांमधील सहा कादंबऱ्यांचा त्यात समावेश आहे.
श्रीलंकी लेखक शेहान करूणतिलका यांच्या ‘द सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ ही कादंबरी यंदा आशियाई राष्ट्रांमधील लेखकांचे स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत असून 87 वर्षांचे ब्रिटिश लेखक अॅलन गार्नर यांच्या ‘ट्रीकल वॉकर’ला नामांकन मिळाले आहे.
गार्नर हे बुकरसाठी नामांकन मिळालेले आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ साहित्यिक आहेत.
याखेरीज अमेरिकेच्या एलिझाबेथ स्ट्राऊट यांची कुटुंब कहाणी ‘ओह विल्यम’,झिम्बाब्वेच्या नोव्हायोलेट बुलावायो यांची राजकीय कादंबरी ‘ग्लोरी’,अमेरिकी लेखक पर्सिवल एवरेट यांची ‘द ट्रीज’ ही रहस्यकथा , आणि क्लेअर कीगन या आयरिश लेखिकेची स्मॉल ‘थिंग्ज लाईक दीज’धर्मकेंद्रीत कादंबरी यंदा पुरस्काराच्या स्पर्धेत आहेत.
परीक्षक समितीमध्ये मॅकग्रेअर यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ शाहिदा बारी, इतिहासतज्ज्ञ हेलन कॅस्टर, टीकाकार एम जॉन हॅरीसन, साहित्यिक अलीन माबांकोऊ यांचा समावेश आहे.
यंदाच्या पुरस्कारासाठी निवड समितीकडे 169 कादंबऱ्या आल्या होत्या.
युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा :
नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
NMC ने युक्रेनच्या ‘मोबिलिटी प्रोग्राम’ला मान्यता दिली.
त्यामुळे असे सर्व विद्यार्थी आता इतर देशांच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
एनएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या आदेशाचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना भारतातील महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
तर, हे त्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे, ज्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये नवीन नियम लागू झाल्यानंतर युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवला होता.
मूक-बधिरांना उपयुक्त ‘फिफ्थ सेन्स’ उपकरणाची निर्मिती :
अपंग व्यक्तींना दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मूक-बधिरांच्या सांकेतिक भाषेचे शब्दांमध्ये रूपांतर करणाऱ्या ‘फिफ्थ सेन्स’ या उपकरणाची यशस्वी निर्मिती उद्योजक परीक्षित सोहोनी आणि ऐश्वर्या कर्नाटकी यांच्या ‘ग्लोव्हाट्रिक्स प्रा. लि.’ तर्फे करण्यात आली आहे.
दिल्लीत आयोजित ‘स्मार्ट सोल्युशन स्पर्धे’त या उपकरणाने बाजी मारली असून याबद्दल सोहोनी आणि कर्नाटकी यांना केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व दोन लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.
युनायटेड नेशन्स (भारत) आणि केंद्रीय नगर विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत अर्ली स्टेज इनोव्हेशन प्रकारात पुण्याच्या ग्लोव्हाट्रिक्स प्रा.लि. या स्टार्टअप् च्या ‘फिफ्थ सेन्स’ या उपकरणाने बाजी मारली.
‘हा’ पाकिस्तानी खेळाडू बनला टी-20 ‘किंग’ :
आयसीसी टी-20 क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मोहम्मद रिझवानने मागे टाकलं आहे.
टी-20 क्रमवारीत रिझवान हा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.
तर, बाबर आझम दुसऱ्या स्थानी गेला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम तिसऱ्या, तर चौथ्या क्रमांकावर भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आहे.
टी-20 क्रमवारीत मोहम्मद रिझवान प्रथम स्थानी आहे. बाबर आझम दुसऱ्या स्थानी आहे.
मार्करमने सूर्यकुमार यादवा मागे टाकल तिसरा क्रमांक पटकवला आहे.
डेव्हिड मलान पाचव्या स्थानावर आहे.
टी-20 अव्वल 10 फलंदाजांच्या क्रमवारीत भारतातील फक्त एका खेळाडूचा समावेश आहे.
दिनविशेष :
8 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.
8 सप्टेंबर – जागतिक शारीरिक उपचार दिन.
8 सप्टेंबर 1954 मध्ये साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना झाली.
स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने8 सप्टेंबर 1962 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.
मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून 8 सप्टेंबर 1991 मध्ये स्वतंत्र झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.