4 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
4 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2020)
ऑनलाइन गेम Rummy आणि Poker वर बंदी- आंध्रप्रदेश सरकार:
- आंध्रप्रदेश सरकारने ऑनलाइन गेम्स रमी आणि पोकरवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.
- या गेम्सच्या माध्यमातून तरुण चुकीच्या मार्गावर भरकटत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
- मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.
- या बैठकीत ऑनलाइन जुगारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला असं माहितीमंत्री वैकटरमय्या यांनी दिली आहे.
- बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “ऑनलाइन जुगाराने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.
- दिशाभूल करुन तरुणांचं नुकसान केलं जात होतं. यामुळेच आम्ही तरुणांचं रक्षण करण्याच्या हेतूने अशा पद्धतीच्या सर्व ऑनलाइन गेम्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला”.
Must Read (नक्की वाचा):
डब्ल्यूएचओ ला 60 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक थकबाकी देण्यात येणार नाही- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प:
- जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) 60 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक थकबाकी देण्यात येणार नाही.
- ती रक्कम संयुक्त राष्टांच्या अन्य कार्यक्रमांसाठी दिली जाईल, असा निर्णय अमेरिके चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
- कोविड-19 ची लस विकसित आणि वितरित करण्याच्या डब्ल्यूएचओ संचालित प्रकल्पात अमेरिका सहभागी होणार नसल्याचे बुधवारी व्हाइट हाऊसने जाहीर केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने वरील निर्णय घोषित केला आहे.
- या पार्श्वभूमीवर साधारणपणे 62 दशलक्ष डॉलरची थकबाकी रोखण्याचा निर्णय हा ट्रम्प प्रशासनाचा संघटनेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा एक भाग आहे.
राष्ट्रीय कबड्डीपटू अमर पवार यांचे निधन:
- भारतीय रेल्वे संघाकडून सलग 11 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्रातील अमर पवार (71 वर्षे) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
- अमर यांचे वडील राजाराम पवार यांनी पाच वेळा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे नेतृत्व केले होते.
- काका शिवराम पवार भारतीय व मध्य रेल्वेचे चतुरस्र खेळाडू. तसेच दोन भाऊ, मुलगा, मुली व सूनदेखील कबड्डी पटू आहेत.
दिनविशेष :
- महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1221 मध्ये झाला.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.
- थॉमस एडिसन यांनी 4 सप्टेंबर 1882 मध्ये इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले. तसेच वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
- केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म 4 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.
- सन 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
- रघुराम राजन यांनी सन 2013 मध्ये रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला होता.