सुवर्ण रोखे (Bonds) योजना (Suvarn Rokhe Yojana)
सुवर्ण रोखे (Bonds) योजना (Suvarn Rokhe Yojana)
योजनेची सुरुवात – 5 नोव्हेंबर 2015
*सुवर्ण रोखे योजनेत रोखे दिले जातील जे 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 50 ग्रॅम व 100 ग्रॅम सोन्याचे असतील. ज्यामधील ग्राहक एका वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याच्या बरोबर रोखे खरेदी करू शकतो. त्याच्या बदल्यात सरकारमार्फत व्याज दिले जाईल, जे सोन्याच्या किंमतीनुसार असेल.
*ग्राहक असे रोखे विविध भागात घेऊ शकतात.
Must Read (नक्की वाचा):
पहिल्या भागाअंतर्गत रोख्यासाठी अर्ज 5 ते 20 नोव्हेंबर 2015 या कालावधीत भरले गेले.
26 नोव्हेंबर रोजी रोखे वाटप केले गेले जे निश्चित बँक आणि पोस्ट ऑफिसमार्फत दिले गेले.
*ग्राहकास असे रोखे (Bonds) बँक, पोस्ट ऑफिस, NBFC व एजंटव्दारे मिळतील. असे रोखे पेपर व D-MET दोन्ही फॉर्ममध्ये उपलब्ध करण्यात आले.
*सोने रोखे पेपर स्वरुपात किंवा D-MET पेपर स्वरुपात उपलब्ध करण्यात आले. ज्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 20 नोव्हेंबर 2015 पूर्वी अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यात आले.
*सुवर्ण रोखे योजनेचा लाभ कोणतीही भारतीय व्यक्ती वैयक्तिक किंवा संयुक्त, ट्रस्ट, HUF, विद्यापीठ, संस्था घेऊ शकते. ज्यासाठी ओळख पत्र म्हणून मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
योजनेत गुंतवणूक मर्यादा –
सोने रोख्यासाठी कमीत कमी 2 ग्रॅम व अधिकाधिक 500 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहक गुंतवणूक करू शकतात. जे भारतीय रु. मध्ये 5,368 रु. पासून 13,42,000 रु. पर्यंत करू शकतात.
जर अशी गुंतवणूक संयुक्त (एकत्रित) रोखे खरेदी करण्यासाठी करण्यात आली तर ती अधिकाधिक 500 ग्रॅम फक्त पहिल्या ग्राहकासाठी लागू होईल.
सुवर्ण रोखे समाप्ती कालावधी –
असे सुवर्ण रोखे आठ वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्ण होतील; परंतु ग्राहकाच्या पसंतीनुसार तो पाच वर्षांनंतर समाप्त केले जाऊ शकतात.
सोने रोख्याचा उपयोग कर्ज घेण्यासाठी संरक्षण म्हणून केला जाऊ शकतो.
*सुवर्ण रोख्यांवर साधारण व्याज दिले जाईल. ज्याचा दर 2.75% निश्चित करण्यात आला आहे. सुरूवातीस अर्धवार्षिक व्याज देण्यात येईल.
*सुवर्ण रोखे योजनेवर साधारण कर लावण्यात येईल.
सुवर्ण रोखे योजनेचे प्रमुख बिंदु –
1.या योजनेत 5, 10, 50 व 100 ग्रॅम सोन्याच्या तुलनेत रोखे खरेदी करू शकतात.
2.एका वर्षात ग्राहक 500 ग्रॅम सोन्याच्या तुलनेत गोल्ड रोखे घेऊ शकतो.
3.अशा रोख्यांसाठी सरकार RBI ला खात्री देईल व रोखे भारत सरकारच्या नावाने उपलब्ध होतील.
4.अशा रोख्यांवर सोन्याच्या किमतीवर आधारित व्याज दिले जाईल.
सुवर्ण रोखे योजनेचे फायदे –
1.सोन्याची आयात कमी होईल.
2.विदेशी चलन बचतीमध्ये सहकार्य मिळेल.
3.अशा रोख्यांवर ग्राहक कर्जही घेऊ शकतात.
4.या योजनेत सोन्याचा योग्य उपयोग होईल, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल.