सांसद आदर्श ग्राम योजना (Saansad Adarsh Gram Yojana – SAGY)
सांसद आदर्श ग्राम योजना (Saansad Adarsh Gram Yojana – SAGY)
योजनेची सुरुवात – जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त 11 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
योजनेचे उद्देश –
1.निवडण्यात आलेल्या ग्रामपंचयतीस स्थानिक विकासाच्या केंद्रात विकसित करणे
2.मानव विकासामध्ये वाढ करणे
3.प्राथमिक सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करणे
4.अधिकार आणि हक्काची प्राप्ती करणे
5.अधिकार आणि हक्काची प्राप्ती करणे
6.असमानता कमी करणे
7.लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन गावातील व्यक्तींना प्रगत पायाभूत सुविधा आणि योग्य संधी उपलब्ध करून त्यांचा विकास करणे.
प्रत्येक खेडेगावाचा आराखडा पुढील तीन बाबींवर अवलंबून असेल –
1.समाजाकडून प्रेरित विकास
2.गरज व मागणी आधारित विकास
3.लोकसहभागातून विकास
*सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत प्रत्येक खासदारासमोर वर्ष 2016 पर्यंत 1 व वर्ष 2019 पर्यंत 3 गावांमध्ये पायाभूत विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
*सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खासदार स्वत:चे गाव तसेच सासरवाडीचे गाव सोडून देशातील कोणत्याही गावाची निवड करू शकतात.
*गावाची निवड करताना 3000 ते 5000 लोकसंख्या असलेली गावे व डोंगराळ भागातील 1000 ते 3000 लोकसंख्या असलेली गावे निवडात येतील.
*सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावाचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भौतिक असा संपूर्ण विकास केला जातो.
*सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत गावातील शाळांना आदर्श शाळा बनविणे.
*सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत 2024 पर्यंत पाच आदर्श गावांची निवड करून त्यांचा विकास करणे.
*सांसद आदर्श ग्राम योजना ग्रामीण विकास मंत्रालयाव्दारे कार्यान्वित केली जाते.
*सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विकासाचा समग्र दृष्टिकोन स्वीकारण्यात आल्याने निवडलेल्या गावांमध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, उपजीविका इ. क्षेत्रांचा विकास प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
*सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत खेड्यातील लोकांमध्ये पायाभूत सुविधा विकासाबरोबर, लोकसहभाग, अंत्योदय, महिला प्रतिष्ठा, लैंगिक समानता, स्वच्छता, सामाजिक न्याय, पर्यावरण जागृती, समुदाय सेवेची वृत्ती, स्वयंसिद्धता, आपापसातील सहकार्य, शांतता व एकोपा इ. मूल्ये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
सांसद आदर्श ग्राम योजना दृष्टीकोन –
1.मॉडेल ग्रामपंचायत विकसित करण्यासाठी सांसद सदस्यांचे नेतृत्व, क्षमता, प्रतिबद्धता आणि उर्जेचा वापर करणे.
2.स्थानिक पातळीवरील विकासासाठी लोकसहभाग जोडणे.
3.परिणाम आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणे.
4.स्वैच्छिक संघटना, सहकारी समित्या आणि क्षैक्षणिक व संशोधन संस्थांबरोबर सहभाग विकसित करणे.
*सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत बनारसमधील जयपूर गावाची निवड करण्यात आली आहे.
जयापूर बनारसपासून 25 km अंतरावर आहे.
जयपूर गावाची एकूण लोकसंख्या 2974 आहे. (पुरुष-1541, स्त्री-1431)
Must Read (नक्की वाचा):
मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency Yojana- MUDRA)