श्रमेव जयते योजना(Shramev Jayte Yojana)
श्रमेव जयते योजना(Shramev Jayte Yojana)
योजनेची सुरुवात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 16 ऑक्टोबर 2014 रोजी श्रम सुधारणा संबंधित दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते कार्यक्रम सुरू करण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):
*ही योजना औपचारिक स्वरुपात नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आली.
*16 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे देशभरातील 11,500 औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांतील (ITIs) प्रशिक्षण घेत असलेल्या 16 लाख विद्यार्थ्यांना मेसेज करून त्यांच्यामध्ये उत्साह वाढविण्याचे कार्य केले.
*श्रमेव जयते योजनेअंतर्गत भविष्यनिर्वाह निधीच्या खातेदारांना एक युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) देण्यात आला, ज्यामार्फत खातेदार खात्याबाबतची संपूर्ण माहिती ऑनलाईन स्वरुपात प्राप्त करू शकतील. त्याचबरोबर खात्यातील रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील.
*या योजनेअंतर्गत श्रमिकांच्या भविष्यनिर्वाह निधीसाठी एकच खाते क्रमांक, एक खिडकी योजनेअंतर्गत 16 फॉर्मऐवजी एकच फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
*श्रमेव जयते योजनेची अंमलबजावणी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाव्दारे करण्यात येत आहे.
*कर्मचार्यांना प्रतिमाह किमान निवृत्ती वेतन मर्यादा 6.50 हजारांहून 15,000 रु. पर्यंत वाढविणे.
*या योजनेअंतर्गत प्रत्येक कामगाराला एकच खाते क्रमांक देण्यात येणार असल्याने नोकरी बदलल्यास नवीन खाते क्रमांक काढणे व बँकांकडे जाण्याचा त्रास वाचणार आहे.
श्रमेव जयते कार्यक्रमातील महत्वाचे मुद्दे –
*कर्मचारी भविष्य निधी खातेधारकांसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबरच्या माध्यमातून पोर्टबिलिटीची सुविधा देणे.
*उद्योगातील लेबर इन्स्फेक्टर पद्धती समाप्त करणे.
*श्रमासंबंधी आकड्यांसाठी ‘श्रम सुविधा’ नावाने एक पोर्टल सुरू करणे.
*मागणी आधारित व्यवसाय प्रशिक्षण देणे.
*देशातील औद्योगिक वसाहतींसाठी वेगवेगळे लेबर आयडेंटिफिकेशन नंबर (LIN) वितरित करणे.
*असंघटित क्षेत्रातील कामगारांना राष्ट्रीय आरोग्य विमा सुविधा पुरविणे.